Team My Pune City – मामाकडे आलेल्या नाशिकच्या तरुणाची किरकोळ कारणावरून पुण्यात हत्या करण्यात आली आहे. ही घटना कात्रज परिसरात शुक्रवारी (दि.11) घडली. या प्रकरणात पोलिसांनी एका अटक केली (Youth Murder) आहे.
Pravin Gaikwad :संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासले,अक्कलकोट मध्ये राडा
आर्यन साळवे असे मयत तरुणाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन साळवे हा त्याच्या मामाकडे धनकवडीमधील आंबेगाव पठार येथे राहण्यासाठी आलेला होता. शुक्रवारी रात्री तो साई सिद्धी चौकात गेला होता.
चौकातील एका पानटपरीवर तो पान खाण्यासाठी गेला. त्याच वेळी आर्यनचा धैर्यशील मोरे यांच्याशी वाद झाला. दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि मोरेने थेट कोयताच (Youth Murder) काढला.
Bhat Sheti : भात उत्पादक शेतकऱ्यांकडून यांत्रिक पद्धतीने भात शेती करण्याकडे कल
धैर्यशील मोरेने रागात कोयत्याने आर्यन साळवेवर सपासप वार केले. कोयत्याचा वार आर्यनने हाताने अडवण्याचा प्रयत्न केला. कोयत्याचा वार हातावर झाला आणि त्याची बोटं तुटली. त्यानंतर मोरेने कोयता त्याच्या डोक्यात मारला. त्यात आर्यन गंभीर जखमी झाला.
कोयत्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आर्यनला नंतर आजूबाजूच्या लोकांनी रुग्णालयात नेले. पण, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धैर्यशील मोरेला पोलिसांनी अटक केली (Youth Murder) आहे.