Team My Pune City – येरवडा परिसरात कौटुंबिक ( Yerawada Suicide Case) वादातून एका व्यक्तीने बहिणीला व्हिडिओ कॉल करून गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना २४ ऑक्टोबर रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास घडली. या प्रकरणी मृत व्यक्तीच्या पत्नी आणि दोन मुलींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव नितीन अशोक साळवे (वय ४२, रा. लक्ष्मीनगर, पर्वती) असे आहे. त्यांनी आत्महत्येपूर्वी बहिणीला फोन करून ( Yerawada Suicide Case) पत्नी व मुलींच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी गळफास घेतला.
या प्रकरणी नितीन यांच्या बहिणी पूनम उमेश कांबळे (वय ४०, रा. धनकवडी) यांनी पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, नितीन यांच्या पत्नी आरती नितीन साळवे (वय ३८) आणि त्यांच्या १८ व २० वर्षांच्या मुलींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात ( Yerawada Suicide Case) आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन साळवे हे मुंबईतील महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाच्या (म्हाडा) कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. ते पत्नी आणि दोन मुलींबरोबर पुण्यातील लक्ष्मीनगर येथे राहत होते. कौटुंबिक कारणांमुळे घरात वारंवार वाद होत असल्याचे तपासात समोर आले आहे.
या घटनेनंतर पत्नी आणि मुलींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बसवराज माळी करत ( Yerawada Suicide Case) आहेत.


















