situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Yerawada Police : कल्याणीनगरमध्ये रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या रेस्टॉरंटवर येरवडा पोलिसांची कारवाई

Published On:
Yerawada Police

Team My Pune City – कल्याणी नगर भागातील कुकू रेस्टॉरंट अँड बार येथे ( Yerawada Police )मंगळवारी (दि. 30 सप्टेंबर) मध्यरात्रीनंतर जोरजोरात संगीत वाजवून ग्राहकांना दारू व जेवण पुरविले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. स्थानिक रहिवाशांनी केलेल्या तक्रारीनंतर येरवडा पोलिसांनी धाड टाकत रेस्टॉरंट मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

PMC : दसऱ्यानिमित्त झाडांच्या फांद्या कापण्यास मनाई; मनपा कडून कडक इशारा

ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेशकुमार पाटील यांच्या ( Yerawada Police )पथकाने केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास पथकाने रेस्टॉरंटवर छापा टाकला असता, तेथे सुमारे १२ ग्राहकांना जेवण व मद्य पुरविले जात होते आणि मोठ्या आवाजात संगीत सुरू होते. कायद्याने परवानगी असलेल्या वेळेनंतरही हा धिंगाणा सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

Ekveera Devi : आई एकवीरा देवीच्या गडावर महानवमी होमाने नवरात्रोत्सवाची सांगता

येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेलके म्हणाले, “कंट्रोल रुमकडून तक्रार आल्यानंतर आमचे पथक घटनास्थळी गेले. रेस्टॉरंटमधून मोठ्या अंतरावरून ही संगीताचा आवाज ऐकू येत होता. नियमांचे उल्लंघन करून रात्री उशिरा ग्राहकांना सेवा ( Yerawada Police )दिली जात असल्याने संबंधित मॅनेजरवर कारवाई करण्यात आली आहे.”

या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (BNS) कलम २२३ (सार्वजनिक सेवकाच्या आदेशाचे उल्लंघन) आणि २९३ (सार्वजनिक त्रास चालू ठेवणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच मॅनेजरला चौकशीसाठी नोटीस बजावून सहकार्य करण्यास सांगण्यात आले ( Yerawada Police ) आहे.

मे २०२४ मध्ये कल्याणी नगर येथे झालेल्या पोर्शे अपघातानंतर पुणे शहर पोलिसांकडून रेस्टॉरंट, पब व बारवर अधिक काटेकोर देखरेख ठेवली जात आहे. विद्यमान नियमांनुसार, अन्न व मद्य सेवा रात्री १.३० वाजेपर्यंत देता येते; मात्र संगीत रात्री १० वाजल्यानंतर वाजवण्यास मनाई आहे. तरीही नियमांचे उल्लंघन होत असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली ( Yerawada Police ) आहे.

Follow Us On