Team My pune city – उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे यमुनोत्री धाममध्ये नद्यांना पूर आला आहे. तेथील रस्ते खचले आहेत. काही ठिकाणी रस्त्यावरील छोटे पूल तुटले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पर्यटक, भाविक अडकले आहेत. यमुनोत्री धाममध्ये (Yamanotri Dham)महाराष्ट्रातील 200 प्रवाशी अडकल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये मुंबईमधील 50 प्रवाशांचा समावेश आहे. पर्यटकांचे व्हिडिओ समोर आले आहेत. महाराष्ट्र सरकारकडे मदतीची मागणी करण्यात आली आहे. उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे यमुनोत्रीला रेड अलर्ट जारी केला आहे.
Mahavitran : रास्तापेठ येथे महावितरणचा ‘हिरकणी कक्षाचे’ उद्घाटन
गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. आजही यमुनोत्री धामला हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तरकाशीतील सिलाई बँड परिसरात ढगफुटीमुळे यमुनोत्री महामार्ग तुटला. त्यामुळे 600 हून अधिक यात्रेकरू यमुनोत्री धाममध्ये अडकले आहेत. रस्ते बंद झाल्याने प्रशासनाने यात्रा तात्पुरती स्थगित केली आहे. स्थानिक प्रशासनाने यात्रेकरूंना सुरक्षित ठिकाणी थांबवले (Yamanotri Dham)आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. आजही यमुनोत्री धामला हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तरकाशीतील सिलाई बँड परिसरात ढगफुटीमुळे यमुनोत्री महामार्ग तुटला. त्यामुळे 600 हून अधिक यात्रेकरू यमुनोत्री धाममध्ये अडकले आहेत. रस्ते बंद झाल्याने प्रशासनाने यात्रा तात्पुरती स्थगित केली आहे. स्थानिक प्रशासनाने यात्रेकरूंना सुरक्षित ठिकाणी थांबवले (Yamanotri Dham)आहे.
यमुना आणि गंगा नद्यांचे जलस्तर वाढल्याने पूर आणि भूस्खलनाचा धोका वाढला आहे. देहरादून, नैनीताल, हरिद्वार, टिहरी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, चंपावत आणि उधमसिंग नगरसह अनेक जिल्ह्यांत हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. शेती, रस्ते आणि घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान (Yamanotri Dham) झाले आहे.