Team My pune city – संवाद, पुणे, वृद्धी रिॲलिटी आणि पुणे महापालिका, अस्तित्व फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बाल गणेश कोथरूड फेस्टिव्हलचे ( Workshop) आयोजन करण्यात आले असून शालेय विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक शाडूमातीच्या श्रीगणेशाच्या मूर्ती बनविण्याच्या दोन कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत.
Madhav Bhandari : अर्बन नक्षलवादाचे जनक काँग्रेसच – माधव भांडारी
शनिवार, दि. २३ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत ( Workshop) छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालय, ४७ मुलींची शाळा, शिवाजी पुतळ्याजवळ, कोथरूड येथे पहिली कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून उद्घाटन सकाळी ११ वाजता ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी यांच्या हस्ते होणार आहे. महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे उपायुक्त विजयकुमार थोरात यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वृद्धी रिॲलिटीचे सीईओ आणि ओनर अमोल शहा असणार आहेत. राजश्री जायभाये यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यशाळेचे संयोजन मुख्याध्यापिका ज्योती मानकर करीत आहेत.
Kundamala News : कुंडमळा येथील तुटलेल्या पुलाचा सांगाडा नदीत गेला वाहून
दुसरी कार्यशाळा सोमवार, दि. २५ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळात लोकसेवा ई-स्कूल, स्वामी समर्थ सोसायटीच्या मागे, पाषाण-सूस रोड ( Workshop) येथे आयोजित करण्यात आली असून कार्यशाळेचे उद्घाटन सकाळी १०:३० वाजता सुप्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर यांच्या हस्ते होणार आहे. माजी आमदार दीपक पायगुडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. मुख्याध्यापक शाफीमोन पी. एच. संयोजन करीत आहेत.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची ( Workshop) जागरूकता निर्माण व्हावी हा कार्यशाळांचा उद्देश आहे. या कार्यशाळांमध्ये सुमारे पाचशे विद्यार्थी सहभागी होणार आहेत, असे वृद्धी रिॲलिटीचे सीईओ आणि ओनर अमोल शहा यांनी सांगितले.
कार्यशाळा वर्ल्ड आर्टिस्ट डेव्हलपमेंट फेडरेशन, सिने मॉडेल आर्ट स्टुडिओचे सुरेश राऊत आणि सातारकर स्टुडिओच्या प्रज्ञा सातारकर ( Workshop) यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती संवाद, पुणेचे सुनील महाजन यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. या कार्यक्रमाचे संयोजन निकिता मोघे आणि केतकी महाजन यांनी केले आहे. प्रवेश विनामूल्य आहे.
मूर्ती स्पर्धेचे प्रदर्शन ( Workshop) दि. २८ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळात यशवंतराव चव्हाण कलादालन येथे आयोजित करण्यात आले असून सर्व गणेश भक्तांना पाहण्यासाठी विनामूल्य खुले आहे, अशी माहिती संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी दिली.