situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Wari Sohala : आता आतुरता विठ्ठल दर्शनाची; आज पालखी सोहळा पंढरपूरात पोहचणार

Published On:
Wari Soahala

Team My pune city – काल दि.४ रोजी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळा भंडीशेगावहुन वाखरीकडे (Wari Sohala) मार्गस्थ झाला होता. दरम्यान वाखरी जवळील बाजीरावाची विहीर येथे माऊलींच्या सोहळ्यातील उभे दुसरे रिंगण पार पडले व माऊलींच्या या सोहळ्या वर्षातील शेवटचे चौथे गोल रिंगण पार पडले.

Pimpri : टाटा मोटर्सकडून उपलब्ध करून देण्यात येणार ईव्ही टेक्निशियन कोर्स

आज दि.५ रोजी वाखरी येथे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामधील शेवटचे (Wari Sohala) तिसरे उभे रिंगण पार पडणार आहे.या रिंगण सोहळ्याचे वारकरी भाविक आतुरतेने वाटत पाहत आहेत.संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा माऊलीं माऊलीं च्या जयघोषात दि.१९ जून रोजी पार पडून आजोळ घरा कडे श्रींच्या पालखीने प्रस्थान केले. दि.२० जून रोजी आळंदीहून माऊलींच्या या सोहळ्याने पंढरपूरकडे लाखो वारकरी भविकांसह खांद्यावर भगवी पताका घेत,टाळ मृदंगाच्या गजर करत,डोईवर तुळशी वृंदावन घेत प्रस्थान केले होते.

Monkey Rescue Operation : दुचाकीच्या धडकेने जखमी वानरास वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या मदतीने जीवदान


ऊन,वारा ,पाऊस याची तमा न बाळगता वारकरी भाविक आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी सुमारे अडीशे किलोमीटर प्रवास उत्साहात व भक्तिमय वातावरणात पायी करत पंढरपूर जवळ काल दि .४ रोजी वाखरी येथे पोहचले आहेत.आज दि.५ रोजी दुपारी ते पंढरपूर कडे मार्गस्थ (Wari Sohala) होणार आहेत.


आता लाखो वारकरी भाविकांना वेध लागले आहेत ते विठ्ठल दर्शनाचे.कधी एकदा पंढरपूर मध्ये जाऊन पवित्र चंद्रभागेत स्नान करून ,त्या विठुरायाचे दर्शन घेईल अशी भावना अंतःकरणा मध्ये होत आहे.
माऊलीं तुकारामांचा जयघोष करत, विठ्ठल नामात, हरिनामाच्या गजरात देहभान विसरत,शेकडो मैलांचा प्रवास करत आता आतुरता लागली ती फक्तं फक्त विठ्ठल (Wari Sohala) दर्शनाची.

कधी डोळे भरून त्या विटे वर उभा राहिलेल्या,कमरेवर दोन्हीं हात ठेवलेल्या पांडुरंगाला तेथे जाऊन पाहिलं या विचारानेच मन त्यांचे कासावीस होत आहे ,तळमळत आहे.जेव्हा सावळे सुंदर मनोहर रूपातील विठ्ठलाचे दर्शन होईल त्याच्या त्या रूपाचे मनाच्या गाभाऱ्यात जतन करून ठेवत ओढ लागेल ती पुढच्या वारीची.

वैष्णवांचा मेळा ,भक्तांचा सागर ,समानतेचा संदेश, कपाळावर टिळा गळ्यात तुळशीची माळ अन् मुखाने हरिनाम असे दृश्य म्हणजे वारी.देवाच्या व संतांच्या नामात ,शकडो मैलांचा प्रवास करत आपले देहभान विसरणे म्हणजे वारी.विठ्ठल भक्तीची ,प्रेमाची विलक्षण अनुभूती घेण्याची संधी म्हणजे वारी.

घरुन निघायचे, एखाद्या संताच्या गावी जायाचे आणि त्या ठिकाणावरुन निघणाऱ्या दिंडीसोबत पंढरपूरला जाणे म्हणजे वारी.विशिष्ट तिथीला आपल्या इष्टदेवताकडे जाणे म्हणजे वारी.पंढरपूरला जाऊन विठूरायाचे दर्शन ‘याची देही याची डोळा,घेणे, पाहणे’ म्हणजे (Wari Sohala) वारी.

Follow Us On