situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Waqf Amendment Bill 2025 : वक्फ दुरुस्ती विधेयक 2025 लोकसभेत मंजूर; ठाकरे यांच्या शिवसेनेचा विरोध

Published On:
Waqf Amendment Bill 2025
---Advertisement---

Team MyPuneCity – वक्फ दुरुस्ती विधेयक 2025 (Waqf Amendment Bill 2025) लोकसभेत मंजूर झाले असून, आता हे विधेयक राज्यसभेत सादर करण्यात येणार आहे. मंगळवारी रात्री उशीरा झालेल्या मतदानात विधेयकाच्या बाजूने 288 मते पडली, तर 232 खासदारांनी विरोधात मतदान केले. या यशामुळे मोदी सरकारने वक्फ सुधारणा विधेयक पुढे नेण्यात महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.

वक्फ दुरुस्ती विधेयकाविरोधात (Waqf Amendment Bill 2025) अनेक विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली. ठाकरे गटाच्या शिवसेनेने याला जोरदार विरोध दर्शवत मतदानात नकारार्थी भूमिका घेतली. पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी विधेयकाच्या उद्देशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “यात पारदर्शकता नाही आणि सरकारचा हेतू संशयास्पद आहे,” असे मत मांडले.

अमित शाह यांचा काँग्रेसवर आरोप

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यावेळी काँग्रेसवर गंभीर आरोप केले. “यूपीए सरकारने दिल्लीतील संपत्ती वक्फ बोर्डाला विकली. वक्फमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी हे सुधारणा विधेयक आवश्यक आहे. काँग्रेसने केवळ मतपेढीसाठी अल्पसंख्याकांना गोंजारले,” असा आरोप शाह यांनी केला. तसेच, विरोधकांवर जनतेत भीती पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला.

Helpline: लोणावळा पोलिसांची पर्यटकांसाठी हेल्पलाइन – 9850112400

विधेयकातील प्रमुख सुधारणा: (Waqf Amendment Bill 2025)

  • युनिफाइड वक्फ मॅनेजमेंट एम्पॉवरमेंट, एफिशियन्सी अँड डेव्हलपमेंट ॲक्ट हे विधेयकाचे नाव असेल.
  • नव्या तरतुदी पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होणार नाहीत.
  • वक्फ संपत्तीच्या सर्वेक्षणाचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे असेल.
  • वादग्रस्त संपत्ती सरकारच्या ताब्यात राहणार.
  • वाद सोडवण्याचे अधिकार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे असतील.
  • वक्फ लवादात तीन सदस्य असतील, ज्यात जिल्हा न्यायाधीश अध्यक्ष असतील.
  • केंद्रीय वक्फ परिषदेतील दोन सदस्य बिगरमुस्लिम असतील.
  • मुस्लिम सदस्यांपैकी दोन महिला असतील.
  • आगा खानी आणि बोहरी समाजासाठी स्वतंत्र वक्फ बोर्डाची तरतूद.
  • वक्फ संपत्तीचे ऑडिट कॅग किंवा तत्सम अधिकारी करणार.

PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या तिजोरीत २०२४-२५ आर्थिक वर्षात सुमारे २ हजार १०० कोटी महसूल जमा

राज्यसभेत काय होईल?

लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक (Waqf Amendment Bill 2025) मंजूर झाल्यानंतर आता त्याचा पुढील टप्पा राज्यसभेत सुरू होणार आहे. राज्यसभेतही या विधेयकावर मोठ्या प्रमाणात चर्चा अपेक्षित असून, विरोधी पक्ष काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. विधेयक मंजूर होण्याच्या प्रक्रियेत आणखी काय घडामोडी होतील, हे येत्या काही तासांत स्पष्ट होईल.

Follow Us On