situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Wanwadi Police : रिक्षाचालकाकडून प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; वानवडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई ; 30 मोबाइल संचांसह आरोपी अटकेत

Published On:
Wanwadi Police

Team My Pune City – रिक्षा प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून ( Wanwadi Police) लुटणाऱ्या रिक्षाचालक आणि त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी रिक्षाचालकाने लुटलेल्या मोबाइल संचांची ऑनलाईन विक्री केल्याचे देखील पोलिस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपींकडून तब्बल 30 मोबाइल संच आणि रिक्षा जप्त केली असून, या टोळीने तीन गुन्हे केल्याचे समोर आले आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव फैजान मोहम्मद गौस शेख (रा. जामा मशीदजवळ, आदर्शनगर, ऊरळी देवाची, हडपसर-सासवड रस्ता) असे असून, त्याच्यासोबत दोन अल्पवयीन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या तिघांकडून एकूण ३ लाख ७० हजार रुपये किमतीचे ३० मोबाइल संच आणि लूटसाठी वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे.

Talegaon School Attack : शाळकरी मुलांच्या भांडणात धारदार शस्त्राने वार

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर भागातील नवीन म्हाडा वसाहत परिसरातील कच्च्या रस्त्यावर रिक्षात तिघे जण परप्रांतीय बांधकाम मजुरांना मोबाइल विक्री करत असल्याची माहिती वानवडी पोलीस ठाण्यातील कर्मचारी अतुल गायकवाड आणि अमोल पिलाणे यांना मिळाली. त्यांनी तत्काळ सहकाऱ्यांसह तेथे धाव घेतली. पोलिसांना पाहताच फैजान शेख आणि त्याचे साथीदार रिक्षातून पसार होण्याच्या प्रयत्नात होते. मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत रिक्षा थांबवून तपासणी केली असता, रिक्षात चाकू आणि मोठ्या प्रमाणावर मोबाइल संच ( Wanwadi Police) आ आढळले.

Pune Diwali Firecracker Rules : दिवाळीत फटाक्यांवर कडक निर्बंध; नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

चौकशीत फैजान शेख आणि अल्पवयीन साथीदारांनी प्रवाशांना लुटीच्या हेतूने रिक्षात बसवून शिवाजीनगर स्थानक परिसरात सोडण्याचे सांगायचे, भाडे म्हणून ५० रुपये घ्यायचे आणि त्यानंतर सोलापूर रस्त्यावरील रेसकोर्स व भैरोबानाला परिसरातील निर्जन भागात रिक्षा थांबवून प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुटायचे, असे त्यांनी कबूल केले. आरोपी प्रवाशांकडून रोकड व मोबाइल संच लुटून पसार व्हायचे. तपासादरम्यान आरोपी फैजान शेखने लुटलेले मोबाइल संच एका संकेतस्थळाच्या माध्यमातून विक्री ( Wanwadi Police) आकेल्याचे समोर आले आहे.

ही कारवाई परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार डोके यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात सहायक निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस कर्मचारी दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, विष्णू सुतार, गोपाळ मदने, अभिजित चव्हाण, अमोल गायकवाड, अर्शद सय्यद, विठ्ठल चोरमले, यतीन भोसले, बालाजी वाघमारे, आशिष कांबळे आणि सुजाता फुलसुंदर यांनी सहभाग घेतला.वानवडी पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात रिक्षातून होणाऱ्या लुटमारीच्या घटनांवर मोठा आळा बसण्याची शक्यता ( Wanwadi Police) आहे.

Follow Us On