Team My Pune City – कोंबड्यांच्या झुंजींवर सट्टा खेळून जुगार ( Wanawadi Police) खेळणाऱ्या टोळीवर वानवडी पोलिसांनी रविवारी छापा टाकून सहा जणांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ५ लाख ११ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा व प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune Metro : लक्ष्मीपूजेनिमित्त पुणे मेट्रोच्या सेवा वेळेत बदल; मंगळवारी सायंकाळी सहानंतर सेवा बंद
वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. १९ ऑक्टोबर) पोलीस हवालदार अमोल पिलाणे व गोपाल मडणे हे नियमित गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, एम्प्रेस गार्डनच्या मागील मोकळ्या जागेत काही जण कोंबड्यांच्या झुंजी लावून जुगार खेळत आहेत. तत्काळ दोन स्वतंत्र पथके तयार करून पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. पोलिस पाहताच काही जणांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी शिताफीने सहा जणांना ताब्यात घेतले.

या प्रकरणी अमोल सदाशिव खुर्ड (४७, रा. रविवारी पेठ), मंगेश आप्पा चव्हाण (५५, रा. भवानी पेठ), निखिल मनीष त्रिभुवन (२०, रा. घोरपडी), आमिर अयुब खान (२८, रा. घोरपडीगाव), सचिन सदाशिव कांबळे (४२, रा. भवानी पेठ) आणि प्रणेश गणेश पराम (२७, रा. कॅम्प, पुणे) यांना अटक केली आहे
या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून सहा रंगीत कोंबड्या, सहा बॅग, तीन दुचाकी, पाच मोबाईल फोन तसेच २,५८० रुपयांची रोकड असा एकूण ५ लाख ११ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात कलम १२(ब) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम व प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त (झोन ५) राजकुमार शिंदे आणि सहाय्यक पोलिस आयुक्त (वानवडी विभाग) धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजयकुमार दोके, एपीआय उमाकांत महाडिक, तसेच पोलिस कर्मचारी दया शेगर, महेश गडवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, अभिजित चव्हाण, यतीन भोसले, आशिष कांबळे, गोपाल मडणे, बालाजी वाघमारे, विष्णु सुतार, अमोल गायकवाड, विठ्ठल चोरमाळे, अर्शद सय्यद आणि सुजाता फुलसुंदर यांनी सहभाग ( Wanawadi Police) घेतला.