situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Wakad Crime News: लग्नात 20 लाखांचा खर्च, 40 तोळे सोने घेतले तरीही विवाहितेचा छळ; सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

Published On:

सासरच्या लोकांवर हत्येचा आरोप पती, सासरा ताब्यात

Team My Pune City –लग्नात 20 लाखांचा खर्च, 40 तोळे सोने घेतले तरीही विवाहितेचा छळ (Wakad Crime News)केल्याचा प्रकार वाकड येथे समोर आला. माहेरहून सतत पैसे आणि इतर गोष्टींची मागणी करत सासरच्या लोकांनी केलेल्या छळाला कंटाळून 26 वर्षीय विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (18 ऑगस्ट) रात्री वाकड येथे घडली. दिव्या हर्षल सूर्यवंशी असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी दिव्याचा पती हर्षल सूर्यवंशी आणि सासरा शांताराम सूर्यवंशी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हर्षल हा उच्च शिक्षित असून तो नामांकित कंपनीत आयटी इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. दिव्याचा तीन वर्षांपूर्वी हर्षल सोबत मोठ्या थाटात विवाह संपन्न झाला होता. लग्नाला काही महिने होत नाहीत, की त्यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली. पती आणि पत्नीमध्ये वाद होत होते. अशी हर्षल हा हर्षल हा सतत माहेराहून पैसे आणण्यासाठी दिव्यावर दबाव टाकत होता. शारीरिक आणि मानसिक छळ करत होता. अखेर या जाचाला कंटाळून दिव्याने सोमवारी रात्री बेडरूमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

शवविच्छेदन अहवालात देखील दिव्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. दिव्याच्या नातेवाईकांनी दिव्यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला. तसा आरोप दिव्याच्या सासरच्या मंडळीवर करण्यात आला आहे. वाकड पोलीसांनी या प्रकरणी दिव्याचा पती आणि सासऱ्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात आणखी काही जणांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. बातमी लिहिण्यापर्यंत वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. वाकड पोलीस तपास करत आहेत.

दिव्याची आई ज्योती खैरनार यांनी सांगितले की, माझी मुलगी आत्महत्येचे पाऊल उचलणार नाही. याची आम्हाला खात्री आहे. छळ होत असल्याबाबत ती सतत सांगत होती. मात्र तिच्या सासरचे पुढे समजून घेतील म्हणून आम्ही काही न बोलता सहन करत होतो. दिव्याच्या लग्नात 40 तोळे सोने, साखरपुड्यासाठी पाच लाख रुपये खर्च, लग्नासाठी 20 लाख रुपये खर्च केला.

Pawana Dam: पवना धरण शंभर टक्के भरले; 24 तासात 2 टक्के वाढ


Pune Rain Update : पुणे जिल्ह्यातील  4 ही धरणे सरासरी 96 टक्कांवर, पाणीसाठा वाढत असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा 

दिव्याच्या भावाची पत्नी हर्षदा देवेंद्र खैरनार यांनी सांगितले की, जॉब कर म्हणून दबाव आणला. घरात फर्निचर करण्यासाठी, टीव्ही, फ्रीज घेण्यासाठी पैसे आण. धोंड्याच्या महिन्यात घरी पाहुणचाराला येण्यासाठी दोन तोळ्यांची सोन्याची अंगठी घेतली. भावाच्या लग्नात सोन्याच्या कड्याची मागणी केली. कड्यासाठी 10 हजार कमी होते म्हणून सर्व पैसे हर्षल याने परत पाठवले. उर्वरित पैशांची व्यवस्था करून पुन्हा पैसे लढवले असता हर्षल याने दिव्याच्या भावाच्या लग्नात येण्यास होकार दिला. दिव्याच्या अंगावर मारहाणीचे व्रण होते. तोंडाला रक्त होते, हाताला आणि कमरेला देखील व्रण होते. त्यामुळे सासरच्या मंडळींनी दिव्याचा खून केल्याचा आरोप हर्षदा खैरनार यांनी केला.

Follow Us On