Team My Pune City – वाघोली परिसरातील ( Wagholi Lift Accident)उर्बानी सोसायटी येथे सोमवारी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने नागरिकांची झोप उडवली. सोसायटीतील लिफ्ट अचानक तांत्रिक बिघाडामुळे कोसळल्याने दोन महिला, दोन पुरुष आणि दोन लहान मुलांसह एकूण सहा जण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर संपूर्ण सोसायटीमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Pune: ‘पुरुषोत्तम’चा शुक्रवारी पारितोषिक वितरण समारंभ;नाना पाटेकर यांची प्रमुख उपस्थिती
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, लिफ्ट मजल्यावर पोहोचताच अचानक तांत्रिक अडथळा निर्माण होऊन ती जोरात खाली घसरली. त्यामुळे आत असलेल्या( Wagholi Lift Accident) प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या. तात्काळ जखमींना प्राथमिक उपचार करून वैद्यकीय मदत पुरविण्यात आली. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी मोठी दुर्घटना घडण्यापासून थोडक्यात बचाव झाला.
Talegaon Cyber Fraud : कलाकाराच्या नावाने मदत मागत तळेगावात ज्येष्ठ नागरिकाचे व्हॉट्सअप खाते हॅक
या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामुळे नागरिकांच्या मनातील भीती अधिकच वाढली आहे.दरम्यान, सोसायटीतील रहिवाशांनी बिल्डरवर देखभाल न केल्याचा गंभीर आरोप केला आहे. लिफ्टची योग्य तपासणी ( Wagholi Lift Accident) आणि देखरेख न झाल्यामुळेच हा प्रकार घडल्याचे त्यांचे म्हणणे आहे. घटनेनंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, रहिवाशांनी संपूर्ण सोसायटीतील सर्व लिफ्टची तातडीने तपासणी करण्याची मागणी केली आहे.
या अपघातामुळे वाघोली परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये लिफ्ट सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले ( Wagholi Lift Accident) आहे.