Team MyPuneCity – वाघोली परिसरात गांजासारखा (Wagholi Crime News) अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन फिरणाऱ्या सराईत विक्रेत्याला वाघोली पोलिसांनी सापळा रचून अटक केली. ८ किलो ४०२ ग्रॅम गांजा आणि मोबाईल असा एकूण १ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव सुरेश साहेबराव पाटील (वय ४४, रा. हिसाळे, ता. शिरपूर, जि. धुळे) असे आहे. तो लोहगाव चौक परिसरात संशयास्पदरीत्या बॅग घेऊन फिरत असताना पोलिसांच्या नजरेत आला. बॅगेची तपासणी केली असता गांजाचा साठा (Wagholi Crime News) आढळून आला.
Khadki : डॉ. पी. एस. आगरवाल यांचे निधन
ही कारवाई २८ मे रोजी करण्यात आली. वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. हे पथक पेट्रोलिंग करत असताना अभिषेक लॉन्सजवळ, लोहगाव चौकात (Wagholi Crime News) हा आरोपी सापडला.
सुरेश पाटील याच्याविरुद्ध वाघोली पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करून दि. २ जून २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या कारवाईत पोलीस अंमलदार समीर भोरडे, रामचंद्र पवार, संदीप तिकोणे, प्रदीप मोटे, नामदेव गडदरे, विशाल गायकवाड, मंगेश जाधव, पांडुरंग माने, साई रोकडे, सालके, आसवले, प्रशांत धुमाळ, शिवाजी चव्हाण आदींनी सहभाग घेतला.
ही यशस्वी कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त हिंमत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल करीत (Wagholi Crime News) आहेत.