Team My Pune City -पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माजी उपमहापौर विश्रांती रामभाऊ पाडळे (वय – ७६) यांचे आज (मंगळवारी) दुपारी साडेतीन वाजता त्यांच्या मूळ गावी कांजी भोयरे (ता.पारनेर,जि. अहिल्यानगर) येथे ह्रदयविकाराने निधन झाले.
PCMC:महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते पे ऍन्ड पार्क आणि व्हॉट्सऍप पार्किंग सुविधेचे उद्घाटन
त्यांच्या मागे पती रामभाऊ पाडळे, दोन मुले प्रशांत, प्रविण आणि कन्या अनिता विकास शिंदे असा परिवार आहे. उद्या बुधवारी (दि.९) सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर पिंपरी कँम्प येथील स्मशानात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे नातेवाईकांनी कळविले आहे. महिला आरक्षण लागू केल्यानंतर महापालिकेत १९९२ मध्ये त्या उपमहापौर होत्या. शहराच्या पहिल्या महिला उपमहापौर होण्याचा मान त्यांना मिळाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर त्या जेष्ठ नेते शरद पवार यांच्या पक्षात कार्यरत होत्या.