Team MyPuneCity – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संगीत अकादमीत कार्यरत असलेले थेरगावचे नामवंत तबलावादक आणि संगीत शिक्षक विनोद कृष्णा सुतार (Vinod Sutar वय ४६) यांचा एका दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला.
रविवारी (दि. ११ मे) दुपारी कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील कातोली फाटा, लक्ष्मी पॅलेस हॉल समोर पाण्याच्या टँकरने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर ते चाकाखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी टँकरचालक मुश्ताक अन्सारी (रा. केर्ली) याला करवीर पोलिसांनी अटक केली आहे.
सुतार यांचे मूळगाव गोगवे (ता. शाहूवाडी) असून सध्या ते (Vinod Sutar) थेरगाव, पिंपरी येथे राहत होते. शाळेला सुट्टी असल्याने दोन दिवसांपूर्वी ते कुटुंबासह सासरवाडी पिशवी (ता. शाहूवाडी) येथे आले होते. रविवारी सुमारे साडेतीन वाजता ते दुचाकीने कोल्हापूरला भाच्याला भेटण्यासाठी रुग्णालयात जात असताना हा अपघात घडला.
Chinchwad Murder : धारदार शस्त्राने वार करत तरुणीची हत्या
टँकर भरधाव वेगात असताना चालकाचा त्यावर ताबा सुटल्याने टँकरने सुतार यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धक्क्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला फेकली गेली, तर सुतार टँकरच्या पुढच्या चाकाखाली आले. त्यांचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी व हृदयद्रावक ठरला.
Sangurdi Road : इंदोरी ते सांगुर्डी रस्त्याच्या ₹ ७.६४ कोटींच्या कामाचे भूमिपूजन
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस उपनिरीक्षक सुभाष मोरे आणि करवीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सुतार यांना (Vinod Sutar) १०८ रुग्णवाहिकेद्वारे शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. माजी उपसरपंच पंडित नलवडे आणि पोलीस पाटील सचिन भोपळे यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.
सुतार यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली आणि भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कलाक्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून, थेरगाव आणि पिशवी परिसरात शोककळा पसरली आहे.