Team MyPuneCity – लोणावळा जवळील वलवण धरणात एक तरुण बुडाला. मित्रांसोबत धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरला असता पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण बुडाला (Valvan Mishap) व मृत्युमुखी पडला. ही घटना शुक्रवारी (३० मे) दुपारी घडली.
नीलेश शिंदे (१७, कासारवाडी, पुणे) असे बुडून मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
Pune: डोनाल्ड ट्रम्प यांचे इमिग्रेशन धोरण हे विवादास्पद – श्री ठाणेदार
याबाबत माहिती अशी की, नीलेश शिंदे त्याच्या १२ मित्रांबरोबर लोणावळ्यात फिरायला आला होता. वरसोली येथून वलवण धरणाच्या बाजूला ते गेले. मित्रांसोबत पाण्यात पोहायला उतरला असता निलेश याला पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे तो पाण्यात बुडाला (Valvan Mishap).
हगवणेंच्या मामांची उचलबांगडी, जालिंदर सुपेकरांना पुण्यातून हलवलं; गृह विभागातून निघाली बदलीची ऑर्डर
शिवदुर्ग मित्र लोणावळा रेस्क्यू टीमला घटनेची माहिती मिळताच वैभव दुर्गे, योगेश दळवी, मयुर दळवी, सागर दळवी, कपिल दळवी, आकाश मोरे, रोहित मोरे, महेश मसने, कुणाल कडू, महादेव भवर, पिंटू मानकर, सतीश सगर, सुनील गायकवाड यांनी घटनास्थळी (Valvan Mishap) धाव घेतली. पाणबुडीच्या सहाय्याने नीलेश याचा मृतदेह शोधून बाहेर काढण्यात आला. लोणावळा ग्रामीण पोलीस तपास करीत आहेत.