Team MyPuneCity – वैष्णवी हगवणे यांच्या आई-वडिलांची उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शुक्रवारी (२३) सायंकाळी भेट घेत सांत्वन केले. यावेळी आरोपींना कठोर शासन करण्यासाठी सरकारच्या वतीने पूर्ण प्रयत्न केले जाणार असून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जाईल, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.
अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, वैष्णवी हगवणे प्रकरणात कोणाचीही गय करायची नाही, असे आदेश पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना दिले होते. या प्रकरणात कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही. आरोपींना तातडीनं बेड्या ठोका असे सांगितले होते. तिघांना आधीच अटक केली होती. सासरे आणि दिराला आज बेड्या ठोकल्या.
“मी कस्पटे कुटुंबीयांशी वैयक्तिक बोललो. तपास करणाऱ्या सर्वांना इथंच बोलावलं आणि आणखी काही माहिती असेल तर त्याबाबत कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. वैष्णवीचे बाळ ज्यांच्याकडे होते त्या निलेश चव्हाण वर ही कडक कारवाईचे आदेश दिलेत”, असे पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले.
पुणे शहर पोलिसांच्या हद्दीत राहणाऱ्या निलेश चव्हाणकडे पिस्तूल आहे. त्याबाबत कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. निलेश चव्हाण याने घटस्फोट दिल्याचे समजत असल्याचे अजित पवार म्हणाले.
राजेंद्र आणि सुशील हगवणे फोन आणि गाडी वारंवार बदलत होता. मात्र पोलिसांनी सापळे रचून आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. सर्व कलमांचा अंतर्भाव करून ही केस स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना कठोर शिक्षा होईल, त्यानुषंगाने पावले उचलण्यास सांगितले आहे, अशी माहिती पवार (Ajit Pawar) यांनी दिली.
दुसरीकडे मोठी सून मयुरीचा ही छळ केल्याचं समोर आलंय. या सर्वांच्या अनुषंगाने केस स्ट्रॉंग केली जाईल. प्रत्येक गोष्टीची शहानिशा केली जाईल. पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्याशी बोललो. त्यांना सांगितलं प्रकरण संवेदनशील आहे. तुमच्या बाबत दबक्या आवाजात बोललं जातं. पण तपासात फोनचे कनेक्शन आढळले तर कारवाई केली जाईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.