situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Vadmukhwadi Murder Case : वडमुखवाडी येथील अल्पवयीन मुलाच्या खून प्रकरणी पाच जणांना अटक

Updated On:
Tamhini Ghat murder

Team MyPuneCity – जुन्या भांडणाच्या कारणावरून एका अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करत त्याचा खून केल्याची घटना रविवारी (11 मे) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास वडमुख वाडी येथे घडली. सुरुवातीला याप्रकरणी तिघांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आणखी दोघांना पोलिसांनी अटक केली (Vadmukhwadi Murder Case)आहेत.

Pimpri Chichwad Crime News 13 May 2025 : गांजा विक्री प्रकरणी तरुणास अटक

सोहम सचिन शिंदे (17, माऊली नगर कॉलनी क्रमांक एक, दिघी) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. नामदेव उर्फ निलेश सोमनाथ शिंदे (25, दिघी), शुभम पंढरीनाथ पोखरकर (22, दिघी), सुमित ज्ञानेश्वर शिंदे (28, दिघी), ओंकार मिलिंद पाटोळे (23, आळंदी), ओंकार सुभाष हिवराळे (21, चऱ्होली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सोहम याचे वडील सचिन प्रल्हाद शिंदे (46) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली (Vadmukhwadi Murder Case)आहे.

Narendra Modi : अणुबॉम्बची धमकी देऊ नका… ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही! – नरेंद्र मोदी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास सोहम शिंदे हा त्याच्या मित्रांसोबत वडमुखवाडी येथील साई मंदिराजवळ गप्पा मारत थांबला होता. त्यावेळी आरोपी तिथे आले. त्यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून सोहम याला शिवीगाळ केली. तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणून आरोपींनी कोयत्याने सोहमच्या डोक्यावर, छातीवर आणि पाठीवर वार केले.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सोहमला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालमत्ता विरोधी पथकाने अवघ्या काही तासात नामदेव, शुभम आणि सुमित या तीन आरोपींना अटक केली. त्यानंतर या गुन्ह्यात आणखी दोघांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी ओंकार पाटोळे आणि ओंकार हिवराळे या दोघांना अटक केली. दिघी पोलीस तपास (Vadmukhwadi Murder Case) करीत आहेत.

Follow Us On