Team My pune city – वडमुखवाडी ( Vadmukhwadi Mishap)येथे नाल्यामध्ये पडलेल्या व्यक्तीला अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूपपणे बाहेर काढले. ही घटना बुधवारी (16 जुलै) रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली. वाचवलेल्या व्यक्तीचे नाव लखन (35) असे आहे.
Rashi Bhavishya 17 July 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास चोवीसावाडी उप अग्निशमन केंद्राला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पारधी यांनी माहिती दिली की, वडमुखवाडी येथील संकल्प गार्डन जवळ नाल्यामध्ये एक व्यक्ती पडला आहे. त्यानुसार सब ऑफिसर विकास नाईक, यंत्रचालक संभाजी दराडे, रवींद्र अहिरे, अग्निशामक विमोचक अवधूत आल्हाट, सखाराम चिमटे, रोहित मांजरे, विष्णू खेडकर, संदीप शिरसाठ, राजवैभव सहजराव, शुभम यादव, भागवत कोरडे, ऋषिकेश रांजणे, अशोक बडे, विशाल चव्हाण, योगिनाथ आवटे, ओमकार गीते हे घटनास्थळी दाखल झाले.
Chinchwad: अग्निशमन दलाच्या जवानांकडून घुबडाच्या पिल्लांना जीवनदान
जवानांनी पाहणी केली असता नाल्यामध्ये एक व्यक्ती विव्हळत पडला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी वीस फूट खोल नाल्यामध्ये रोपच्या साह्याने उतरून पडलेल्या व्यक्तीला स्ट्रेचरवर ठेवले. त्यानंतर रस्सीच्या सहाय्याने त्याला बाहेर काढण्यात आले. जखमी झालेल्या व्यक्तीला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. व्यक्तीचा जीव वाचवल्याबद्दल उपस्थित नागरिकांनी अग्निशमन दलाच्या ( Vadmukhwadi Mishap) जवानांचे टाळ्या वाजवून आभार मानले.