Team MyPuneCity – आंबी – वारंगवाडी मावळ येथील पुष्पलता डी वाय पाटील रुग्णालयाचे उद्घाटन रविवारी (दि ८) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे.
आंबी मावळ येथील पुष्पलता डी वाय पाटील रुग्णालयाचे मुख्य अतिथी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रविवारी (८ जून) दुपारी १२:३० वाजता उद्घाटन होणार आहे. डी वाय पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष व कुलपती डॉ. विजय पाटील,उपाध्यक्ष व उपकुलपती डॉ. शिवानी पाटील हे यावेळी उपस्थित राहणार आहेत.
या रुग्णालयामुळे मावळ परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक उत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहे. हा कार्यक्रम पुष्पलता पाटील रुग्णालय, डॉ डी वाय पाटील विद्यापीठ, एमआयडीसी रोड जवळ, आंबी- वारंगवाडी, तालुका मावळ जिल्हा पुणे या ठिकाणी होणार आहे.
शासकीय कार्यालयातील ई-सेवा केंद्रांमध्ये स्टॅम्प पेपरची मागणी बेकायदेशीर – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
आरोग्य सेवेच्या या नवीन पर्वाची सुरुवात असल्याने आनंद सोहळ्यास सहभागी होण्यासाठी आयोजकांनी सांगितले आहे.