Team MyPuneCity – मावळ तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशा आशयाच्या मागणीचे निवेदन मावळ तालुका भाजपा किसान मोर्चाच्या वतीने तहसीलदारांना देण्यात( Vadgaon Maval) आले.
यावेळी पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष धामणकर, तालुकाध्यक्ष सूर्यकांत सोरटे,कार्याध्यक्ष विकास शेलार, उपाध्यक्ष सोमनाथ काळे, सरचिटणीस हरीभाऊ दळवी ॲड सुभाष तुपे,शांताराम दरेकर, खरेदी विक्री संघाचे संचालक मधुकर जगताप,संतोष येवले आदी मान्यवर उपस्थित होते.
Maval : पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करा तसेच चिखलमय रस्त्याची डागडुजी करा; मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची सरकारकडे मागणी
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील आठवडाभर झालेल्या अवकाळी पाऊसामुळे संपुर्ण महाराष्ट्रात आणि आपल्या पुणे जिल्हात व मावळ तालुक्यात प्रचंड शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर अति नुकसान झाले आहे. त्यामध्ये भुईमुग,ज्वारी,बाजरी व इतर पिके पावसामुळे काढता येत नसुन, भुईमुगांच्या शेंगाना मोड येत आहे. तसेच बाजरीचे पिक मोठ्या जोमात असून ऐन काढणीच्या वेळात अवकाळी पाऊस पडल्याने सदर बाजारीचे पिक हे भुईसपाट झालेले आहे. तसेच कणसांना पुन्हा मोड फुटले आहे. तसेच ज्वारीचे कणसे देखील काळी पडलेली आहे. तसेच शेत माल टोमॅटो भाजीपाला व फळ पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे म्हटले ( Vadgaon Maval) आहे.
अवकाळी पाऊसामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होवून शेतक-यांवर उपासमारीची वेळ आली आहे. विशेषत: भात पिक घेण्याच्या तयारीत शेतकरी असताना शेतजमीनीना वापसा नसल्या कारणाने भात रोप वाटिका तयार करता येत नसुन शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे.
अवकाळी पाऊसामुळे शेतक-यांचे प्रचंड झालेले नुकसान भरपाई बाबत शेत पिकाचे पंचनामे करून व शासन स्थरावर योग्य ती कार्यवाही करून शेतक-यांना नुकसान भरपाई मिळावी अशी नम्र विनंती देखील निवेदनात करण्यातन ( Vadgaon Maval) आली आहे.