Team MyPuneCity – मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री.साईबाबा सेवाधाम, कान्हे फाटा येथे ४ ते १८ मे या कालावधीत निवासी बालवारकरी आध्यात्मिक संस्कार शिबीर पार पडले. रविवारी हभप दत्तात्रय महाराज हजारे यांच्या कीर्तन सेवेने शिबिराची सांगता झाली. १५ दिवसांच्या शिबिरात श्लोक, स्तोत्र, अभंगाचे पठण, गीता पाठ, टाळ व पखवाज वादन, हरिपाठ, योगा, मैदानी खेळ असे उपक्रम तसेच तालुक्यातील जेष्ठ किर्तनकार व प्रवचनकार यांच्या मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले.यावर्षी शिबिरात ९० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. श्रीमंत रमेशसिंहजी व्यास हे होते.

या कार्यक्रमासाठी भामचंद्र डोंगर निवासी ह.भ.प. शंकर महाराज मराठे,खादी ग्रामोद्योगचे चेअरमन अंकुशराव आंबेकर, देवराई संस्थेचे अध्यक्ष सुकनशेठ बाफना, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नामदेव कोंडे, कान्हे गावचे सरपंच विजय सातकर,सरपंच सौ.योगिता कोकरे, दिंडी समाजाचे अध्यक्ष महादूबुवा सातकर,नवजीवन पतसंस्थेचे अध्यक्ष उमेश शिंदे, नवजीवन पतसंस्थेचे संस्थापक मारूती आगळमे,उद्योजक संकेत शिंदे, मा. सभापती राजाराम शिंदे, मा सभापती सुवर्णा कुंभार, उदयोजक संतोष बोडके,उद्योजक संपत कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
सकाळी ९ ते ११ या वेळेत ह.भ.प. दत्तात्रय महाराज हजारे यांची किर्तनरूपी सेवा संपन्न झली. त्यानंतर श्री पांडुरंगाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरूवात झाली. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व त्या मान्यवरांनी वारकरी संप्रदाय मंडळ करत असलेल्या कामाचे कौतुक केले. ह.भ.प. शंकर महाराज मराठे यांनी मार्गदर्शन करुन शुभाशिर्वाद दिले.

यावेळी मुलांनी शिबीरात प्राप्त केलेल्या कलागुणांचे प्रदर्शन झाले. मंडळाचे कार्याध्यक्ष संतोष कुंभार यांच्या वतीने शिबीरातील विद्यार्थ्यांना विविध आकर्षक बक्षिसांचे वाटप करण्यात आले. तसेच मंडळाच्या वतीने शिबीरातील सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होता. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे कार्याध्यक्ष ह.भ.प. संतोष कुंभार यांनी केले. त्यानंतर मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. नंदकुमार भसे महाराज यांनी आपले मनोगत व्यक्त केले व मंडळाने आजवर राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.
Shankar Jagtap: नागरिकांना पावसाळ्यात त्रास होऊ नये म्हणून आमदार शंकर जगताप उतरले थेट रस्त्यावर!
तसेच मंडळाकडून लवकरात लवकर मावळ तालुक्यामध्ये भव्य वारकरी भवन बांधण्याचा संकल्प यावेळी त्यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर होत असलेल्या संत तुकाराम महाराजांच्या भव्य मंदिरासाठी मावळातील प्रत्येक गावागावातून व प्रत्येक घरातून मंडळाच्या माध्यमातून निधी संकलन करण्याचा मानस यावेळी मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार भसे महाराज यांनी यावेळी व्यक्त केला.


सर्वांचे आभार संघटक गोपिचंद महाराज कचरे यांनी मानले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे उपाध्यक्ष ह.भ.प. दिलीप वावरे यांनी केले.अध्यक्षीय समारोपाचे भाषण होवून पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
मंडळाच्या वतीेने श्री.साईबाबा सेवाधाम येथे विद्यार्थ्यांच्या निवासाची, भोजनाची व प्रशिक्षणाची उत्तम सोय केलेली होती. विद्यार्थ्यांना शिक्षक/ मार्गदर्शक म्हणून ह.भ.प. दत्तात्रय महाराज हजारे, ह.भ.प.गोपिचंद महाराज कचरे, ह.भ.प. सोमनाथ महाराज सातपुते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सचिव रामदास पडवळ, कोषाध्यक्ष नितीन आडिवळे सर, बालवारकरी समितीचे अध्यक्ष काशिनाथ सातकर, उपाध्यक्ष शंकरराव खेंगले, विश्वस्त बाळासाहेब राजिवडे, कायदेशीर सल्लागार ॲड. सागर शेटे, ह.भ.प. बजरंग घारे, विश्वस्त भरत येवले, जेष्ठ किर्तनकार नाथा महाराज शेलार, सुभाष महाराज पडवळ, बळवंत येवले, आंदर मावळ विभागीय अध्यक्ष दिपक रावजी वारिंगे, कामशेत शहर अध्यक्ष शंकर खेंगले, लोणावळा शहर अध्यक्ष बाळासाहेब पाठारे, वडगाव शहर अध्यक्ष दत्तात्रय टेमगिरे, वारकरी सेवा समितीचे अध्यक्ष देवराम सातकर,मंडळाचे विभाग प्रमुख शिवाजीराव बोडके, निलेश शेेटे, संजय महाराज बांदल, सुखदेव गवारी, दशरथ सावंत, पंढरीनाथ वायकर, सदाशिव पेटकर, दत्ताभाऊ ठाकर, राजाराम असवले, बंडू कदम, भाऊसाहेब मापारी, रवि ठाकर, भिवाजी गायखे, रोहिदास खांडेभराड, बालवारकरी नियोजन समितीचे सचिव ह.भ.प. साईनाथ राऊत, बालवारकरी नियोजन समितीचे खजिनदार ह.भ.प. गोविंद सावले,वारकरी सेवा समितीचे गुलाब बधाले, मारूती देवकर, सखाराम घनवट पाटील, चंद्रकांत रामभाऊ सातकर, बाळासाहेब देशमुख, दशरथ काळे, क्रियाशील सदस्य ह.भ.प. बाळासाहेब वारिंगे, शंकरराव शेटे, नामदेव खांडभोर, भोजन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नानासाहेब घोजगे, रोहिदास जगदाळे, मोहन कदम, दत्तात्रय चोपडे यांसह बालवारकरी नियोजन समितीच्या सर्वच पदाधिकारी व सदस्य आदींनी विशेष प्रयत्न केले.