Team MyPuneCity- मान्सून पूर्व जोरदार पावसामुळे मावळ तालुक्यातील भात खासरांमध्ये प्रचंड पाणी साठल्याने भाताच्या रोपांची पेरणी कशी करावी असा यक्ष प्रश्न मावळ तालुक्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
गेली आठ दिवस मावळ तालुक्याच्या विविध भागात मान्सूनच्या अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग चालू आहे. यामुळे मावळ तालुक्यामध्ये भात पिकासाठी असलेल्या भात खासरांमध्ये या पावसाचे पाणी साठल्यामुळे शेतकऱ्यांसमोर भाताची रोपे तयार करण्यासाठी लागणारी पेरणी कशी करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेली आठ दिवस सतत रोज मावळ तालुक्याच्या विविध भागांमध्ये या पावसाची हजेरी जोरदारपणे लागत असून सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.
Pune: पुण्यात भारतीय प्राणी संशोधन संस्थेच्या हॅकाथॉन स्पर्धेत नवकल्पनांचा झंझावात; 110 तासांच्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

या पावसामुळे मावळ तालुक्याच्या डोंगर उतारावरून तसेच ओढ्या नाल्यांमधून या पावसाचं पाणी वाहू लागले आहे तर पवना, इंद्रायणी, सुधा,आंद्रा आणि कुंडलिका या नद्यांना ओढ्या नाल्यातूनही पाणी आल्याने या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे.
मावळ तालुक्यात भात पिकाचे क्षेत्र मोठे आहे. भात पीक घेण्यापूर्वी आधी भात खासरांमध्ये रोपांची पेरणी करावी लागते आणि अशी पेरणी साधारणपणे शेतकरी जूनच्या पहिल्या आठवड्यात मृगाचा पाऊस झाल्यावर करत असतात. यावर्षी अवकाळी पावसाने मे च्या दुसऱ्या आठवड्यापासूनच जोरदार हजेरी लावून शेतकऱ्यांची दान दान केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर भात रोपांच्या पेरणी बाबतचा मोठा यक्षप्रश्न निर्माण झालेला आहे.
जून महिन्यात खरीप भात पिकाच्या पेरणीसाठी लागणारे बियाणे, शेताची मशागत ह्या सगळ्या गोष्टी करत असतानाच या पावसाने जोरदार तडाका दिल्याने खाचरांमध्ये पाणी आल्यामुळे आता पेरणी कशी करावी असा अडचणीचा प्रश्नही शेतकऱ्यांना सतावत आहे.