Team MyPuneCity – वडगाव मावळ परिसरातील शिवली येथील ओढ्यामध्ये मासे आणि खेकडी पकडण्याच्या कारणावरून दगडु वाघमारे (पूर्ण नाव अज्ञात), अंकुश दगडु वाघमारे आणि लहु दगड्डु वाघमारे या तिघांनी फिर्यादी अंजना बाबु पवार (वय ४५, व्यवसाय मजुरी, रा. चावसर, मावळ, पुणे) व तिच्या कुटुंबीयांवर मारहाण केली आहे.
दि. ५ जून २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास शिवली येथील ओढ्यामध्ये मासे व खेकडी पकडण्यासाठी गेलेल्या अंजना पवार व तिच्या मुलगी ताराबाई जाधव, जावई हरी लहानु जाधव आणि मुलगा रोहीत सिताराम वाघमारे यांना आरोपींनी शिवीगाळ करत काठीने मारहाण केली. त्यामुळे त्यांना अपघातजन्य जखमा झाल्या आहेत.
पोलीसांनी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.