Team My Pune City – पुण्याच्या पूर्वेकडील उरुळी कांचन परिसर गुंतवणूकदारांसाठी ( Uruli Kanchan News) नवे हॉटस्पॉट ठरत आहे. येथील वाढते औद्योगिक प्रकल्प, जवळपासचे महामार्ग, प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि रेल्वे सुविधा यामुळे व्यापारी व बांधकाम क्षेत्राला मोठी चालना मिळत आहे. परिणामी, या परिसरात जमिनींच्या किंमती झपाट्याने वाढत असून गुंतवणूकदारांचा कल वाढत चालला आहे.
MHADA : पुणे-पिंपरी चिंचवड शहरात MHADAची ६,१६८ घरांची लॉटरी; अर्जाची संधी ३१ ऑक्टोबरपर्यंत
उरुळी कांचनमधून पुणे-सोलापूर महामार्ग, लोणी-भांडगाव जोडमार्ग यांसारख्या ( Uruli Kanchan News) महत्त्वाच्या रस्त्यांची सोय असल्याने मालवाहतूक सुलभ झाली आहे. त्याचबरोबर रेल्वे स्थानकाची उपलब्धता आणि पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामामुळे येत्या काळात या भागातील आर्थिक उलाढाल आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
Maval : मावळ पर्यटन तालुका घोषित होणार
स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन जीवनावरही या विकासाचा परिणाम ( Uruli Kanchan News) दिसून येतो आहे. नव्या व्यवसायांना चालना, रोजगाराच्या संधी आणि आधुनिक पायाभूत सुविधांच्या विकासामुळे उरुळी कांचन परिसराला आर्थिकदृष्ट्या नवी दिशा मिळत आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील गुंतवणूकदारांसाठी हा भाग सुवर्णसंधी मानला जात आहे.