Team MyPuneCity – सोमवारी (दि. १९ मे) संध्याकाळच्या सुमारास पिंपरी चिंचवड शहरात विजांच्या कडकडाटासह अचानक आलेल्या जोरदार पावसाने (Unseasonal Rain) शहरवासीयांची मोठी तारांबळ उडवली. सायंकाळी साडेसहा वाजेनंतर हवामानात अचानक बदल होऊन घनघटाट ढगांची गर्दी झाली आणि काही क्षणातच मुसळधार पावसाला सुरुवात झाली.
शहरातील चिंचवड, पिंपरी, निगडी, आकुर्डी, भोसरी, रहाटणी, वाकड, सांगवी, तसेच हिंजवडी परिसरात जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले. काही भागांत घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना घरातून पाणी बाहेर काढण्याची लगबग करावी लागली. साचलेल्या पाण्यामुळे छोट्या वाहनांना व दुचाकींना वाहतूक करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
Khandala: खंडाळा तलावाजवळ पार्क केलेल्या कारची काच फोडून १.२२ लाखांची चोरी
वाहनधारकांनी आडोशाला थांबून पाऊस थांबण्याची वाट पाहत रस्त्याच्या कडेला गाड्या उभ्या केल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. याशिवाय काही ठिकाणी सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने आणि वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती असल्याने वाहतूक कोंडीची स्थिती उद्भवली होती. विशेषतः पिंपरी फाट्याजवळ, दापोडी आणि दत्तवाडी परिसरात वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.
हवामान खात्याचा इशारा
हवामान विभागाने सोमवारी सायंकाळी ७ वाजता ‘नाउकास्ट वॉर्निंग’ जारी केली होती. त्यानुसार, पुढील ३ ते ४ तासांत पुणे, ठाणे, सातारा, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह (४०-५० किमी प्रतितास वेगाने) विजांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस (Unseasonal Rain) होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना आवश्यक काळजी घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
सॅटेलाईट प्रतिमांमध्ये घनदाट ढगांची नोंद
सध्याच्या सॅटेलाईट प्रतिमांमध्ये महाराष्ट्राच्या मध्य व पश्चिम भागात घनदाट ढगांची उपस्थिती दिसून येत आहे. यामुळे संध्याकाळी व रात्रीही मुसळधार पावसाचा जोर कायम (Unseasonal Rain) राहण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तवली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात आधीच अनेक ठिकाणी ड्रेनेज व जलनिच्छासन यंत्रणेची अवस्था बिघडलेली असल्याने अशा मुसळधार पावसामुळे पाणी साचण्याची समस्या उग्र रूप घेताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पुढील चार-पाच पावसाची शक्यता कायम
उत्तर-मध्य मध्यम महाराष्ट्रावर उच्च स्तरावरील चक्रीय वाऱ्यांचे परिसंचरण होत असून, त्यामुळे कोकण व लागून असलेल्या मध्यम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आर्द्रता येत आहे. पुणे जिल्ह्यासाठी पुढील ४८ तासांसाठी तीव्र पावसाच्या सरींसह (Unseasonal Rain) वीज आणि गडगडाट यांचा इशारा देण्यात आला असून, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, सातारा, कोल्हापूरच्या घाट विभागांमध्ये तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पुढील ४-५ दिवस तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे ऑरेंज अलर्ट कायम राहण्याची शक्यता आहे.२१ ते २३ मे दरम्यान पुणे, सातारा, कोल्हापूर तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील घाटांमध्ये जाणे टाळा. कमी दृश्यमानता, ओले व घसरडे रस्ते, तात्पुरते पूर यामुळे मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात. सतत माहिती घेत रहा, सतर्क रहा आणि सुरक्षित रहा.