Team My pune city – आळंदी शहरात वाढत्या (Unauthorized flex) अनधिकृत जाहिरात फलकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आळंदी नगरपरिषदेने आज कठोर पावले उचलली आहेत. नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रातील विद्युत पोल, सार्वजनिक मालमत्ता, पुणे-आळंदी रस्ता, देहू रस्ता व प्रदक्षिणा मार्गांवरील परवानगीशिवाय लावलेले एकूण 195 फ्लेक्स बॅनर्स काढण्यात आले.
या अनुषंगाने ९ प्रिंटिंग युनिट्सना अंतिम नोटीस बजावण्यात आली. ज्यांनी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता जाहिरात फलक प्रिंट करून लावले (Unauthorized flex) होते.
PCMC : पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – आयुक्त शेखर सिंह
- राजमाता फ्लेक्स – ज्ञानेश स्वामी व प्रथमेश वाळुंजकर(Unauthorized flex)
- डिजायर क्रिएशन – दत्ता खालापुरे
- साई फ्लेक्स – पांडुरंग टकलकर
- एकदंत फ्लेक्स – राहुल गुट्टे व मुकेश जंगले
- माऊली फ्लेक्स – बंटी भिवरे
- पद्मावती फ्लेक्स – वैभव काटे
- कोणार्क फ्लेक्स – जनार्दन पितळे
- राजमुद्रा फ्लेक्स – कुमार लाखंडे
- स्टार मल्टिमीडिया स्टुडिओ – रविंद्र रंधवे.
सदर कृत्य हे “महाराष्ट्र मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध अधिनियम, 1995” आणि मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशांचे उल्लंघन असून, त्याअंतर्गत (Unauthorized flex) कारावास व आर्थिक दंडाची तरतूद आहे. तसेच, शासन निर्णयानुसार प्रत्येक वैध फलकावर QR कोड लावणे बंधनकारक आहे.सदर कृत्य हे “महाराष्ट्र मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध अधिनियम 1995” मधील तरतुदींनुसार गैरकायदेशीर आहे.
Shero-shayari : मनाला आवडलेले शेर – कुछ इस तरहसे मैने जिंदगी को आंसा कर दिया…
कलम 3 नुसार:(Unauthorized flex)
- तीन महिन्यांपर्यंत कारावास
- किंवा ₹2,000/- पर्यंत दंड
- किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे.
नगरपरिषदेची सूचनाः ( Unauthorized flex)
- संबंधितांनी ७ दिवसांत अनधिकृत फलक हटवावेत.(Unauthorized flex)
- भविष्यात कोणताही फलक प्रिंट करण्यापूर्वी नगरपरिषदेची वैध परवानगी व QR कोड असल्याची खात्री करावी.
अन्यथा, संबंधित प्रिंटर युनिट्सवर फौजदारी व दंडात्मक कारवाई केली जाईल, तसेच व्यवसाय परवाना रद्द करण्याची कार्यवाही केली जाईल.
नगरपरिषद शहरातील स्वच्छता, शिस्त व नियमबद्ध व्यवस्था यासाठी कटीबद्ध आहे. सर्व नागरिक, व्यापारी व प्रिंटर युनिट्सनी सहकार्य ( Unauthorized flex) करावे.