Team MyPuneCity –प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हि नियुक्ती केली आहे. याची घोषणा १३ जुलै २०२५ रोजी करण्यात आली आहे. निकम यांच्या सोबतच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून सी. सदानंदन मास्टर, हर्षवर्धन श्रृंगला आणि डॉ. मीनाक्षी जैन यांनाही राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.
Alandi:आळंदीत २४ वर्षीय युवकाकडून गांजासह अटक; अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
Lohagad Fort: लोहगड किल्ल्यावर पुरातत्व विभाग, ग्रामस्थ व शिवप्रेमींचा जल्लोष ..
कोण आहेत उज्ज्वल निकम?
उज्ज्वल निकम यांचा जन्म ३० मार्च १९५३ रोजी महाराष्ट्रातील जळगाव येथे मराठी कुटुंबात झाला. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात जळगाव येथे सिव्हिल वकील म्हणून केली होती . १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट खटल्यात त्यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले होते. त्यांनी २००८ च्या २६/११ मुंबई हल्ल्याच्या खटल्यात दहशतवादी अजमल कसाबविरुद्ध यशस्वीपणे खटला चालवला आणि कसाबला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
निकम यांनी प्रमोद महाजन हत्या प्रकरण, २०१३ चा मुंबई सामूहिक बलात्कार प्रकरण आणि २०१६ चा कोपर्डी बलात्कार आणि खून खटला यासारख्या अनेक हाय-प्रोफाइल खटल्यांमध्ये राज्य सरकारचे प्रतिनिधित्व केले आहे.