Team My pune city – महाराष्ट्र सरकारने हिंदी भाषेच्या सक्तीचा निर्णय मागे घेतला त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख ,( ठाकरे गट प्रमुख) उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विजयी मेळावा आज मुंबईत पार पडला आहे.
दोन्ही ठाकरे बंधू तब्बल २० वर्षांनी एका व्यासपीठावर एकत्र आले. यावेळी मेळाव्याला संबोधित करतांना उद्धव ठाकरे यांनी एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठीच अशी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. यामुळे आता मनसे आणि शिवसेना एकत्र येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
या विजयी मेळाव्याच्या सुरुवातीला राज यांनी जमलेल्या मराठी बंधू भगिनींना संबोधित केले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात “सन्माननीय राज ठाकरे आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी हिंदू माता भगिनींनो” अशी केली. उद्धव यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाचे कौतुक केले. उद्धव म्हणाले “राज आणि माझी भेट व्यासपीठावर झाली. पंचायत अशी, त्यांनी मला सन्माननीय उद्धव ठाकरे म्हटलं. साहजिकच आहे, त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलं आहे,”.
Pavana Dam : पवना धरणात दमदार पावसामुळे जलसाठ्यात मोठी वाढ – साठा 71 % वर
उद्धव ठाकरे म्हणाले , माझ्या भाषणाची काही गरज आहे, असं वाटत नाही. आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यावर सर्वांचं लक्ष भाषणाकडे आहे. पण भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं याकडे सर्वांचं लक्ष आहे.
ते पुढे म्हणाले “आमच्या दोघातील अंतरपाट होता तो अनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची तुमच्याकडून अपेक्षा नाही. एकत्र आलो. एकत्र राहण्यासाठी,”.
Wari Sohala : आता आतुरता विठ्ठल दर्शनाची; आज पालखी सोहळा पंढरपूरात पोहचणार
मला कल्पना आहे. आज अनेक बुवा महाराज बिझी आहेत. कोण लिंब कापतंय, कोण टाचण्या मारतं. कोण गावी जाऊन अंगारे धुपारे करत आहेत. त्या सर्वांना सांगतो. या भोंदूपणा विरोधात माझ्या आजोबांनी लढा दिला होता. त्यांचे वारसदार म्हणून आम्ही उभे ठाकलो आहोत, असेही उद्धव ठाकरेंनी म्हणाले.