Team My Pune City –राज्यातील विरोधकानीं आज आगामी निवडणुकांचा पार्श्वभूमीवर मतदार यादीतील गोंधळ, (Uddhav Thackeray)निवडणूक आयोगाचा कारभार आणि मतदार नोंदणीप्रक्रियेतील पारदर्शकतेच्या मुद्द्यांवरून थेट निवडणूक आयोगाला भेट दिली.
यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसेप्रमुख राज ठाकरे , राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब थोरात, अनिल देसाई, अनिल परब, जयंत पाटील (शेकाप) यांच्यासह विरोधी पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने आज महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेतली.
Maval: पत्नीची पतीला मारहाण
या बैठकीत विविध पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींबाबत निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले.यावेळी उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत विविध मुद्दे उपस्थित केले.
“मतदान कुणाला जातं हेच कळत नाही!” अस म्हणत उद्धव ठाकरे यांनी मतदार यादीतील गोंधळावर नाराजी व्यक्त केली. देशात आता कुठेच निवडणुका नाहीत तर VVPat आणा, अशी मागणी देखील त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.