उद्योगमंत्री सामंत यांची पत्नी नीलम शिर्के सामंत यांच्या खाजगी संस्थेकडे आहे स्पर्धेची जबाबदारी
Team My Pune City – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत च (Uday Samant) दरवर्षी आयोजित होणाऱ्या राज्यस्तरीय बालनाट्य आणि दिव्यांग बालनाट्य स्पर्धा यंदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. यावर्षी या स्पर्धांचे आयोजन करण्याची जबाबदारी शासनाने थेट न घेता बालरंगभूमी परिषद या खासगी संस्थेकडे सोपवली आहे.
Pashan: पाषाणमध्ये ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक; मिठीचा बहाणा करून चोरी
या निर्णयावरून विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला असून, “शासकीय स्पर्धा खासगी संस्थेकडे वळवून त्यांचे खासगीकरण केले जात आहे आणि हे सर्व राजकीय दबावाखाली घडत आहे,” असा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या संस्थेच्या अध्यक्षा अभिनेत्री नीलम शिर्के सामंत असून त्या राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे या निर्णयाला राजकीय रंग चढला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. त्यांच्या मते, “गेल्या २१ वर्षांपासून या स्पर्धा शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून यशस्वीरित्या पार पडत आहेत. मात्र, यंदा कोणतीही अधिकृत घोषणा न करता खासगी संस्थेकडे जबाबदारी सोपवणे म्हणजे पारदर्शकतेला धक्का च (Uday Samant) आहे.”
राज्यभरातील अनेक नामवंत नाट्यसंस्थांनीही या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. त्यांचा इशारा आहे की, “या पद्धतीमुळे स्पर्धेचा दर्जा, परीक्षकांची निवड आणि नाट्यप्रेमींचा सहभाग धोक्यात येईल.”
विरोधकांची ठाम मागणी आहे की, बालनाट्य आणि दिव्यांग बालनाट्य स्पर्धा शासनानेच आयोजित कराव्यात आणि त्यावर संपूर्ण नियंत्रण सांस्कृतिक कार्य संचालनालयाचेच (Uday Samant) राहावे.






















