Team My Pune City – बंडगार्डन रस्त्यावर सोमवारी (दि.25) रोजी (TVS Service Center) रात्री साडेआठ च्या सुमारास अग्निशमन दल नियंत्रण कक्षात ताराबाग या तीन मजली इमारतीत तळमजल्यावर टिव्हीएस कंपनीचे शोरूम व सर्व्हिस सेंटर येथील असणाऱ्या दुचाकींना आग लागल्याची वर्दि मिळताच अग्निशमन दलाकडून नायडू व येरवडा अग्निशमन केंद्रातील वाहन व मुख्यालयातील एक वॉटर टँकर तातडीने रवाना करण्यात आला होता.
Pune: ‘नाचून नाही, तर वाचून गणेशोत्सव साजरा करा’
घटनास्थळी पोहचताच जवानांनी पाहिले की, तीन मजली इमारतीत(TVS Service Center) तळमजल्यावर टिव्हीएस कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली असून दुचाकी वाहने पेटल्याने प्रचंड धूर निर्माण झाला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रथम आतमध्ये कोणी अडकल्याची खाञी करताना एकजण धुरामुळे अडकल्याचे समजताच जवानांनी त्याला एकीकडे सुखरूप बाहेर काढून इतरञ पाण्याचा मारा सुरु केला.

धूर जास्त प्रमाणात असल्याने श्वसन यंत्र परिधान करीत सुमारे तीस(TVS Service Center) मिनिटांत आग आटोक्यात आणत कुलिंग ऑपरेशन सुरु ठेवले. या घटनेत इलेक्ट्रिक व पेट्रोल अशा एकूण 60 दुचाकी जळाल्या असून यामध्ये काही नवीन तसेच दुरुस्ती करिता आलेल्या दुचाकी असल्याचे समजले. सदर ठिकाणी इलेक्ट्रिक वायरिंग, यंत्र सामुग्री, बॅटरी, वाहनांचे सुटे भाग, संगणक, सोफा, एसी, टेबलखुर्च्या, कागदपत्रे देखील आगीत जळाली आहेत.
Rashi Bhavishya 26 August 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
आगीचे नेमके कारण समजले नसून अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी विजय भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी आपले कार्य वेळेत पार पाडत पुढील धोका टाळला. यावेळी महावितरण कर्मचारीवर्ग व पोलिस उपस्थित (TVS Service Center) होते.