Team MyPuneCity – जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानतर्फे गुरुवारी (दि. २५) श्री संत तुकाराम महाराज ३४० वा पालखी सोहळा कार्यक्रम जाहीर करण्यात (Tukaram Maharaj Palkhi Ceremony ) आला. श्री क्षेत्र देहू यांच्याकडून या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक अधिकृतरित्या प्रसारित करण्यात आले आहे. या आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या वेळापत्रकाचा उपयोग वारकरी बांधवांना त्यांच्या नियोजनासाठी होईल.
Kamshet News : कामशेत ग्रामस्थांकडून शासकीय जागेच्या मोजणीला विरोध; अधिकाऱ्यांना घेराव
देहू येथून संत तुकाराम महाराज पालखीचा प्रारंभ 18 जूनपासून देहू येथे प्रारंभ होत आहे. १८ जूनला रात्री इनामदार वाड्यात पालखीचा मुक्काम असेल.पुढे दुसऱ्या दिवशी पालखी आकुर्डीकडे जाईल आणि आकुर्डी विठ्ठल मंदिरात मुक्काम करेल. त्यानंतर निवदुंगा विठोबा मंदिर, पुणे येथे पोहोचेल आणि २० जून रोजी तेथे (Tukaram Maharaj Palkhi Ceremony ) मुक्काम होईल .
PCMC : सेवानिवृत्तीनंतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निरोगी आणि आनंददायी जीवन जगावे -तृप्ती सांडभोर
२१ जून २०२५ रोजी पुणे शहरात पूर्ण मुक्काम असेल. २२ जून रोजी पालखी पुणे शहर सोडेल आणि हडपसर, मांजरी, लोणी काळभोर रेल्वे स्टेशन मार्गे लोणी कोळभोर विठ्ठल मंदिर येथे मुक्काम करेल .त्यानंतर यवत – बारामती – इंदापूर – बावडा – वाखारी या मार्गे पंढरपूरकडे जाईल. ६ जुलै२०२५ रोजी आषाढी एकादशी आहे. त्यानंतर पालखीच्या परतीचा प्रवास सुरु (Tukaram Maharaj Palkhi Ceremony ) होईल.