Team My Pune City –मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मना’चे श्लोक’ हा (Tu Bol Na Movie)सिनेमा गेल्या काही दिवसापासून वादात सापडला होता. या चित्रपटाच्या नावाला हिंदू संघटनांनी जोरदार विरोध केला होता. चित्रपटाचे शीर्षक हे संत रामदासस्वामींच्या ग्रंथाशी संबंधित पवित्र शब्द असल्याने या नावाला विरोध केला जात होता.त्यामुळे पुण्यात या चित्रपटाला हिंदूत्ववादी संघटनांनी विरोध केला. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी या चित्रपटाचे शो बंद पाडले. हे नाव बदला नाही तर चित्रपट प्रदर्शित होवू देणार नाही असा इशारा देण्यात आला होता. या इशाऱ्यानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. शिवाय चित्रपटाचे नावही बदलले जाईल अशी घोषणा ही करण्यात आली. त्यानुसार आता या चित्रपटाचे नाव बदलण्यात आले आहे.
मृण्मयी देशपांडे मुख्य भूमिका असलेला ‘मनाचे श्लोक’ या मराठी चित्रपटाचे शोज काही हिंदुत्ववादी संघटनांनी बंद पडले होते. त्यानंतर या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यात आले. आधी हा चित्रपट 10 ऑक्टोबरला प्रदर्शित करण्यात आला होता. पण त्याचे प्रदर्शन थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी नवे नाव आणि प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर करू असे सांगण्यात आले. त्यानुसार या चित्रपटाचे नवे नाव आता ‘तू बोल ना’ असे असेल. हा चित्रपट आता ‘तू बोल ना’ या नव्या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. तो 16 ऑक्टोबर ला गुरुवारी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
MLA Sunil Shelke : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसचा शक्तीप्रदर्शन मेळावा ; आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचा जोश, पक्षाच्या बळकटीकरणाला नवा वेग!
Pune: शिकारपूर सोशल फाऊंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान
का होता विरोध
‘मनाचे श्लोक’ नावाने श्री समर्थ रामदास स्वामी अध्यात्मिक पुस्तक लिहिलं आहे. त्यामुळे चित्रपटाला असं नाव देऊ नका अशी मागणी केली जात होती. हा चित्रपटात लिव्ह-इन रिलेशनशिपसारखा मुद्द्या भोवती फिरणार आहे. त्यामुळे अशा आशयाच्या चित्रपटाला हे नाव असू नये अशी भावना हिंदूत्ववादी संघटनांची होती. त्यामुळे त्यांनी या चित्रपटाला विरोध करायला सुरूवात केली होती. हे नाव देऊन लोकांच्या भावना दुखावल्याची तक्रार केली जात होती.