Team MyPuneCity – पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक पोलीस विभागाने खाजगी ट्रॅव्हल्स बससाठी शहरात पिकअप पॉइंट आणि वाहतूक मार्ग बंद केल्यामुळे ट्रॅव्हल्स व्यवसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील अन्य सर्व प्रकारच्या वाहनांना रस्त्यावर थांबण्यास व फिरण्यास परवानगी असताना फक्त खाजगी ट्रॅव्हल्स बससाठी निर्बंध लादले जात असल्याने पिंपरी-चिंचवड ट्रॅव्हल्स (Travels Bus) असोसिएशनच्या वतीने सोमवार, ७ एप्रिलपासून पिंपरी चिंचवड वाहतूक पोलीस कार्यालय, एल्प्रो मॉल, चिंचवडगाव येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
शहरात कंपनीच्या बसेस, मोठे मालवाहू ट्रक, खडी-मुरूम वाहणारे हायवा, क्रशर गाड्या, रिक्षा, टेम्पो, स्कूल बस, सिटी बस आणि एसटी महामंडळाच्या बसेस यांना कोणतीही निर्बंध नाहीत. मात्र, संध्याकाळच्या ठराविक वेळेत शहरात प्रवेश करणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स बससाठीच बंधने घालण्यात आली आहेत. ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या (Travels Bus) वतीने महानगरपालिका व वाहतूक विभागाकडे अनेक वर्षांपासून बस पार्किंग व पिकअप पॉइंटसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येत आहे. परंतु, वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या (Travels Bus) पदाधिकाऱ्यांनी वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तांना पत्र देऊन तात्पुरत्या स्वरूपात पूर्वीचे बस थांबे सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे न्याय मिळवण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
Waqf Amendment Bill 2025 : वक्फ दुरुस्ती विधेयक 2025 लोकसभेत मंजूर; ठाकरे यांच्या शिवसेनेचा विरोध
धरणे आंदोलनाचा तपशील:
- ठिकाण: पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलीस कार्यालय, एल्प्रो मॉल, चिंचवडगाव
- दिनांक: सोमवार, ७ एप्रिल २०२५
- वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६
Helpline: लोणावळा पोलिसांची पर्यटकांसाठी हेल्पलाइन – 9850112400
ट्रॅव्हल्स असोसिएशनचे (Travels Bus) अध्यक्ष बंडूशेठ काळभोर आणि सचिव बाळा दानवले यांनी या आंदोलनात सर्व ट्रॅव्हल्स व्यवसायिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाने जर वेळेत निर्णय घेतला नाही, तर पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.