Team MyPuneCity : भारतीय सेनेच्या “ऑपरेशन सिंदूर” या यशस्वी मोहिमेनंतर (Tiranga Yatra) देशभक्तीची भावना अधिक सशक्त करण्यासाठी मावळ तालुक्यात एक भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली मंगळवार, दिनांक २० मे २०२५ रोजी दुपारी ३ वाजता देहूगाव, तळेगाव दाभाडे येथून वडगाव मावळपर्यंत काढण्यात येणार आहे.
“एक दिवस देशासाठी, देशाच्या वीर जवानांसाठी” या प्रेरणादायी घोषवाक्याखाली ही रॅली देशसेवेचा अभिमान जागवणारी ठरणार आहे.
या तिरंगा यात्रेमध्ये ह.भ.प. संग्राम बापू भंडारे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असून, ह.भ.प. पांडुरंग महाराज शितोळे (शास्त्री) यांची देखील प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या रॅलीचा समारोप (Tiranga Yatra) वडगाव पंचायत समिती येथे होणार आहे. संपूर्ण मावळ तालुक्यातील राष्ट्रप्रेमी नागरिक, युवक व विविध संस्था या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
या उपक्रमाचे आयोजक म्हणून समस्त राष्ट्रभक्त मावळकरी कार्यरत आहेत. देशभक्तीचा संदेश जनमानसात पोहचवण्यासाठी आणि भारतीय सेनेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही रॅली एक प्रेरणादायी पाऊल ठरणार आहे.