Team MyPuneCity – थेरगावमधील गुजरनगर परिसरात जुन्या वादातून तरुणाावर धारदार कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला. तरुणाच्या हाताची बोटे आणि पंजा कोयत्याने तोडून खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी (२३ जून) पहाटे ३.२५ वाजताच्या ( Thergaon Crime News) सुमारास घडली.
Alandi : इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ; भक्ती सोपान पुलावरून पाणी
रोहन सोपान निमज (२०, गुजरनगर, थेरगाव), शुभम पवार (२०, चिंचवड) व प्रशांत उर्फ बापू सकट (२२, गुजरनगर, थेरगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. राहुल प्रल्हाद कनघरे (३०) असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. राहुल यांच्या आईने वाकड पोलीस ठाण्यात ( Thergaon Crime News) फिर्याद दिली आहे.
Maval Crime News: पोलिसांना माहिती दिल्याने एकास मारहाण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा राहूल व त्यांच्या भावाच्या घराशेजारी राहणाऱ्या आरोपींमध्ये पूर्वी भांडण झाले होते. याचा राग मनात धरून आरोपींनी संगनमताने सोमवारी पहाटे राहुलवर कोयत्याने हल्ला केला. कोयत्याचा वार राहुल यांच्या डाव्या हातावर लागून हाताचा पंजा चार बोटांसह तुटून गंभीर जखम झाली. आरोपींनी ‘आम्ही इयले भाई आहोत’ असे म्हणत दहशत निर्माण ( Thergaon Crime News) केली.