कामकाजासाठी केवळ दोन खोल्यांपासून सुरूवात, (Ambegaon Police Station) आता सुसज्ज नव्या वास्तूत स्थलांतर
Team MyPuneCity – पुणे शहरातील आंबेगाव पोलीस स्टेशनच्या (Ambegaon Police Station) सुसज्ज नव्या इमारतीचे उद्घाटन दिनांक २३ मे रोजी पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. फित कापून आणि कोनशीला अनावरण करून हा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला.

आंबेगाव पोलीस स्टेशनची (Ambegaon Police Station) स्थापना ११ ऑक्टोबर २०२४ रोजी करण्यात आली होती. सुरुवातीला या पोलीस ठाण्याचे कामकाज केवळ दोन खोल्यांमधून सुरू करण्यात आले होते. मात्र, वाढती कामकाजाची गरज आणि सुविधा लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या इमारतीचे बांधकाम हाती घेण्यात आले. हे बांधकाम यशस्वीरित्या पूर्ण होऊन आता पोलीस स्टेशनने नव्या वास्तूत कामकाज सुरू केले आहे.
या उद्घाटन समारंभाला सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे, आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक गजानन चोरमले तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त प्रियांका गोरे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वंजारी, स्वाती देवधर, भोजलींग दोडमीसे, मोहन कळमकर, रतिकांत कोळी, युवराज शिंदे, मारुती वाघमारे, नितीराज थोरात, सुरेश शिंदे व अन्य पोलीस अंमलदार तसेच मान्यवर उपस्थित होते.
सरकारच्या तिजोरीत मोठी भर, RBI कडून 2.68 लाख कोटी रुपयांचा लाभांश जाहीर
या नव्या इमारतीमुळे आंबेगाव पोलीस स्टेशन हद्दीमधील (Ambegaon Police Station) नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार असून, पोलिसांचे कार्य अधिक प्रभावी आणि सुसज्जरित्या पार पाडले जाणार आहे.