Team My Pune City – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाआणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.राज्यातील सर्व विरोधी पक्ष नेते आज निवडणूक अधिकारी यांची भेट घेणार आहेत. या भेटीसाठी अनेक पक्षाचे नेते एकत्र आले असून महाविकास आघाडीसह मनसे आणि इतर पक्ष ही आज एकत्र आले आहेत. या नेत्यांचं शिष्टमंडळ मंत्रालयात दाखल झाले आहे.
निवडणूक प्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या शंकांवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे , बाळासाहेब थोरात ,आदित्य ठाकरे, वर्ष गायकवाड यांच्या सह अर्क नेत्यांचा समावेश आहे. महाविकास आघाडीसोबत राज ठाकरे यांची उपस्थिती राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानली जात आहे. ठाकरे बंधू एकत्र येऊन निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Pune Theft News : चोरलेल्या मोटारीतून घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या जाळ्यात; 21 लाखांचा मुद्देमाल जप्त

निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेण्यामागे आगामी निवडणुका पारदर्शक व्हाव्यात, मतदार याद्यांची पुनर्रचना योग्य पद्धतीने व्हावी यासह अनेक मागण्या आहेत.