situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Test Cricket World Cup : आफ्रिका संघाने इतिहास रचत मिळवले कसोटी विश्व करंडक!

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity (विवेक कुलकर्णी) – क्रिकेट विश्वात ‘चोकर्स’ म्हणून हिणवले जाणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाने, अखेर हा शिक्का पुसून टाकत नवा इतिहास रचला आहे. इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या कसोटी प्रकारातील विश्वकरंडकाच्या (Test Cricket World Cup) अंतिम सामन्यात आफ्रिकन संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाचा ५ गडी राखून पराभव करत तब्बल २७ वर्षांनंतर आयसीसीचे दुसरे जेतेपद मिळवले आहे.

आयसीसीच्या सर्वाधिक स्पर्धा जिंकणाऱ्या कांगारू संघाला अंतिम फेरीत नमवण्याचा ऐतिहासिक पराक्रम आफ्रिकन संघाने साकारला. टी२०च्या झगमगाटातही अनेकांना आजही कसोटी क्रिकेटचे वेड आहे, आणि त्याची कारणमीमांसा या सामन्याने पुन्हा एकदा अधोरेखित केली. सामन्याच्या पहिल्या दोन दिवसांत खेळ कधी ऑस्ट्रेलियाच्या तर कधी आफ्रिकेच्या बाजूने झुकत होता. मात्र, अखेर कर्णधार टेम्बा बाऊमा आणि एडिन मार्करम यांच्या झुंजार खेळीच्या जोरावर आफ्रिकेने केवळ जेतेपद (Test Cricket World Cup) पटकावले नाही, तर क्रिकेट महासत्तेला नामोहरम करत खऱ्या अर्थाने ‘चोकर्स’ नाही तर ‘विजेते’ आहोत हे जगाला दाखवून दिले.

या विजयाला आणखी महत्त्वाचे परिमाण मिळाले आहे ते म्हणजे आफ्रिकेच्या या संघाचे नेतृत्व टेम्बा बाऊमा या कृष्णवर्णीय खेळाडूकडे होते. वर्णभेदाच्या आरोपांमुळे पूर्वी बदनाम झालेल्या आफ्रिकन क्रिकेटसाठी (Test Cricket World Cup) हे एक विलक्षण प्रतीकात्मक यश ठरले. अशा ऐतिहासिक क्षणात या संघाचे नेतृत्व बाऊमासारख्या खेळाडूकडे असणे, हेच फार मोठे विधान आहे.

११ जून रोजी लॉर्ड्स मैदानावर सुरू झालेल्या या सामन्यात आफ्रिकेने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. आफ्रिकेच्या गोलंदाजांनी कांगारू फलंदाजांना २१२ धावांतच गुडघे टेकायला लावले. प्रत्युत्तरात आफ्रिकन संघ केवळ १३८ धावांत गारद झाला. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २०७ धावा करत आफ्रिकेसमोर २८२ धावांचे लक्ष्य ठेवले.

एकीकडे अनेक क्रिकेट रसिकांना वाटले की हे लक्ष्य गाठणे अशक्यप्राय आहे. सामना परत एकदा ऑस्ट्रेलियाच्या हातात गेला असेच वाटू लागले होते. केवळ ९ धावांवर आफ्रिकेचा पहिला सलामीवीर रिकलटन बाद झाला (Test Cricket World Cup) आणि पुन्हा चोकर्सचा भूतकाळ आठवू लागला. मात्र, त्यानंतर मैदानात आलेल्या एडिन मार्करम आणि मुल्डर यांनी ६१ धावांची भागीदारी करत संघाचे मनोबल उंचावले.

स्टार्कने मुल्डरला बाद करत ऑस्ट्रेलियाला पुन्हा आशा दिली खरी, पण नंतर आलेल्या कर्णधार बाऊमाने मार्करमसह १४७ धावांची भागीदारी करत सामन्याचा प्रवाहच बदलून टाकला. विशेष बाब म्हणजे बाऊमा जखमी अवस्थेत खेळत होता. धावताना वेदना सहन करत तो खेळत राहिला आणि संघासाठी लढला.

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत आफ्रिकेला विजयासाठी केवळ ६९ धावांची गरज होती. मात्र, अनेक चाहत्यांच्या मनात अजूनही शंका होती. चौथ्या दिवशी (Test Cricket World Cup) बाऊमा ६६ धावांवर कमीन्सकडून बाद झाला आणि लगेचच स्टब्सही तंबूत परतला. पण दुसऱ्या बाजूने मार्करमने संयम आणि चिवटपणे फलंदाजी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. शेवटी हेडने घेतलेल्या झेलमुळे त्याची स्मरणीय खेळी संपली खरी, पण लॉर्ड्सवरील संपूर्ण प्रेक्षकांनी उभे राहून त्याचे अभिनंदन केले.

शेवटी डेव्हिड बेन्गम आणि वेरिकन यांनी उर्वरित काम पार पाडत आफ्रिकेला हा ऐतिहासिक विजय मिळवून दिला. तब्बल २७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आफ्रिकेने आयसीसी स्पर्धेतील दुसरे जेतेपद (Test Cricket World Cup) पटकावले. या विजयाने आफ्रिकन संघाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.

या सामन्यातील ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला तो म्हणजे आफ्रिकेचा ‘विजयाचा शिल्पकार’ – एडिन मार्करम.

– विवेक कुलकर्णी


Follow Us On