Team My Pune City – ताथवडे येथे एडन गार्डन सोसायटीच्या गेटजवळ (Tathawade) एका कारने धडक दिल्याने एका तीन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार (1 ऑगस्ट) रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
शिवानी जगन दाभाडे (वय 3) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. या प्रकरणी, जगन वामन दाभाडे ( वय 50 ताथवडे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अक्षय शांताराम चौधरी (वय 28 वाकड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
PMPML: श्रावण महिन्यात शिवलिंग तीर्थक्षेत्र दर्शनासाठी पीएमपीएमएलची खास ‘पर्यटन बससेवा क्र.12’ सुरु
Ajit Foundation: अजित फाऊंडेशनला CSR अंतर्गत किराणा साहित्याची भरीव
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या ताब्यातील कार निष्काळजीपणे आणि भरधाव वेगात चालवून वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्याने फिर्यादीची मुलगी शिवानी जगन दाभाडे हिला धडक देऊन गंभीर जखमी केले, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.