Team My Pune City – ताम्हिणी घाटात बेवारस अवस्थेत सापडलेल्या तरुणाच्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना ( Tamhini Ghat murder ) यश आले आहे. या प्रकरणात वारजे माळवाडी पोलिसांनी खून झालेल्या तरुणाच्या मोठ्या भावाला अटक केली आहे. व्यसनांच्या आहारी गेलेल्या लहान भावाशी झालेल्या वादातून त्याचा खून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
ऋषिकेश अनिल शिर्के (वय 23, रा. गायकवाड चाळ, मावळे आळी, कर्वेनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ऋषिकेशचा मोठा भाऊ अनिकेत अनिल शिर्के (वय 26) याला अटक करण्यात आली. शनिवारी सकाळी ताम्हिणी घाटात बेवारस अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह ( Tamhini Ghat murder ) सापडल्याची माहिती पौड पोलिसांना मिळाली होती. खून झालेल्या तरुणाची ओळखही पटलेली नव्हती. पौड पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता.
Pune Rain Update : पावसाची रिपरिप सुरूच, पवना, खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला
आरोपी अनिकेतने लहान भाऊ ऋषिकेश याचा ताम्हिणी घाटात खून केल्याची माहिती वारजे माळवाडी पोलीस ठण्यातील उपनिरीक्षक सचिन तरडे ( Tamhini Ghat murder ) यांना खबऱ्याने दिली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने अनिकेतचा शोध घेण्यास सुरुवात केली. अनिकेत हा कर्वेनगरमधील वनदेवी मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या टेकडीच्या परिसरात लपून बसला होता.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने अनिकेत आणि ऋषिकेश शुक्रवारी (दि.25 जुलै) रात्री कर्वेनगर येथून दुचाकीवरून रत्नागिरीतील ( Tamhini Ghat murder ) लांजा तालुक्यातील गोळवशी-शिर्केवाडी येथे देवदर्शनासाठी निघाले. दोघे मध्यरात्री ताम्हिणी घाटातील गोणवडी गावाजवळ थांबले.
Rashi Bhavishya 28 July 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
ऋषिकेशला दारू आणि गांजाचे व्यसन होते. अनिकेतने ऋषिकेशला व्यसन सोडण्यास सांगितले. या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात अनिकेतने ऋषिकेशनवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. ऋषिकेशचा मृत्यू झाल्यानंतर अनिकेत पसार ( Tamhini Ghat murder ) झाला.