Team MyPuneCity – सैन्य दलात नोकरी देण्याच्या बहाण्याने दोघांनी मिळून 22 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली. चार जणांना आर्मीचे बनावट कॉल लेटर देखील पाठविण्यात आले. हा प्रकार फेब्रुवारी 2019 ते 22 सप्टेंबर 2022 या कालावधीत त्रिवेणीनगर तळवडे(Talwade Crime News) येथे घडला.
Mahalunge Crime News : सोन्यात गुंतवणूक करण्यास सांगत महिलेची 9.60 लाखांची फसवणूक
याप्रकरणी दत्तात्रय साहेबराव कोकाटे (65, चिंचवड) यांनी 12 मे 2025 रोजी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाजीराव सखाराम पाटील (45, निघोजे खेड), संतोष शंकर ठाकूर (40, रावेत) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला (Talwade Crime News) आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी कोकाटे यांची सून, तिचा भाऊ अमोल फणसे, पुतण्या रोहित आणि फिर्यादी यांचे मित्र मोहन शिंदे यांच्या मुलाला आर्मी मध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी आरोपींनी चौघांकडून एकूण 22 लाख 50 हजार रुपये घेतले. आरोपींनी आर्मीचे बनावट कॉल लेटर तयार करून ते पाठवून विश्वास संपादन केला. मात्र ते लेटर बनावट असल्याचे उघडकीस आल्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला (Talwade Crime News) आहे.