Team My Pune City – तळजाई टेकडी ( Taljai Crime News ) परिसरात प्रेमसंबंधाच्या संशयातून एका तरुणावर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडली. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून जखमी तरुणाने स्वतः फिर्याद दिली आहे.
Bhumi Abhilekh Bharti 2025 : भूकरमापकांच्या ९०३ पदांसाठी तब्बल ३७ हजार अर्ज; नोव्हेंबरमध्ये परीक्षा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी तरुण एका कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. २८ ऑक्टोबर रोजी त्याच्या मैत्रिणीने त्याला फोन करून भेट घेतली. त्यानंतर दोघे दुचाकीवरून फिरायला गेले असता सदू शिंदे स्टेडियमजवळ आरोपींनी त्यांना अडवले. त्यावेळी एका आरोपीने तरुणाला विचारले, “तू माझ्या बहिणीला संदेश का पाठवितोस?” त्यावर तरुणाने उत्तर दिले की, “तुझ्या बहिणीचा विवाह झाल्यापासून मी संबंध तोडले आहेत.” तरीदेखील आरोपींनी वाद ( Taljai Crime News ) घालत त्याला शिवीगाळ केली.
Rashi Bhavishya 1 November 2025 – कसा जाईल आपला आजचा दिवस?
वाद वाढल्यावर एका आरोपीने तरुणाला पकडले आणि दुसऱ्याने कोयत्याने त्याच्या डोक्यावर वार केला. गंभीर जखमी अवस्थेत तरुणाला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार नोंदवली.या प्रकरणाचा तपास सहायक फौजदार जोशी करत (Taljai Crime News) आहेत.


















