situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Talegaon water Supply : विस्कळीत पाणीपुरवठा अखेर सुरळीत होण्याच्या मार्गावर

Published On:

तळेगाव दाभाडे शहराला उद्यापासून टप्प्याटप्प्याने नियमित पाणीपुरवठा सुरू होणार

Team MyPuneCity गेल्या दोन दिवसांपासून पाण्याच्या त्रासाने हैराण झालेल्या तळेगावकरांसाठी (Talegaon water Supply) दिलासादायक बातमी आहे.

सोमाटणे गावातील ओढ्यालगत असलेली २० इंची मुख्य पाईपलाईन बुधवार (दि. २१) रोजी फुटल्याने तळेगाव दाभाडे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र आज (शुक्रवार, दि. २३) हे दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले असून उद्यापासून (शनिवार, दि. २४) टप्प्याटप्प्याने नियमित पाणीपुरवठा (Talegaon water Supply) सुरळीत करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी पाणीपुरवठा अभियंता अभिषेक शिंदे यांनी दिली.

मुख्य पाईप फुटल्याने तळेगाव गावभाग, तुकाराम नगर, मस्करनेस कॉलनी, कडोलकर कॉलनी, शांताई नगरी, काळोखेवाडी तसेच वडगाव फाटा ते जनरल हॉस्पिटलदरम्यानच्या परिसरात पाण्याचा अपुरा व असमतोल पुरवठा (Talegaon water Supply) होत होता. या अचानक उडालेल्या गोंधळामुळे नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला.

नगरपरिषदेने तत्काळ लिकेज दुरुस्तीचे काम हाती घेतले. मात्र सततच्या पावसामुळे काँक्रीटीकरणाच्या कामात अडथळे येत होते. गुरुवारी दुपारी झालेल्या पावसामुळे अंशतः झालेले काँक्रिट वाहून गेले. परिणामी, आज पुन्हा नव्याने काँक्रीटीकरण करण्यात आले आहे.

सध्या सोमाटणे पंपिंग स्टेशनवरील तीनपैकी दोन पंप कार्यरत आहेत. त्याद्वारे काही भागांमध्ये एक दिवसाआड कमी दाबाने पाणीपुरवठा (Talegaon water Supply) सुरू करण्यात आला आहे. येत्या काही तासांत काँक्रिट पूर्ण व दुरुस्त होईल, त्यानंतर तिसरा पंपही सुरू करण्यात येणार असून पूर्ण क्षमतेने आणि नियमित स्वरूपात पाणीपुरवठा सुरू होईल, अशी माहिती शिंदे यांनी दिली.

दरम्यान, नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन नगरपरिषदेने केले आहे. मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी सांगितले की, “विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्याचे काम आज पूर्ण झाले असून उद्यापासून टप्प्याटप्प्याने पुरवठा सुरळीत होईल.”

Follow Us On