Team MyPuneCity – तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या हद्दीतील (Talegaon News) ओढे नाले येत्या पावसाळ्यापूर्वी साफ करण्याचे काम सध्या वेगाने सुरू असून आत्तापर्यंत शहरातील १६ ओढे नाले यांचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे.
तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्य अधिकारी विजयकुमार सरनाईक (Talegaon News), उपमुख्याधिकारी ममता राठोड, विभाग प्रमुख अभियंता अभिषेक शिंदे तसेच स्वच्छता व आरोग्य निरीक्षक प्रमोद फुले, मयूर मिसाळ, तुकाराम मोरमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम वेगाने सध्या सुरू आहे.
PCPL : ‘पिंपरी चिंचवड प्रीमीअर लीग’ (पीसीपीएल) टेव्न्टी-२० क्रिकेट स्पर्धा !!
येत्या पावसाळ्यात ओढे नाले अति पावसामुळे तुंबू नयेत व पावसाचे पाणी सहजगत्या निघून जावे म्हणून हे काम नगर परिषदेने पाऊस सुरू होण्यापूर्वी हाती घेतलेले आहे. १ मे पासून या कामाला सुरुवात झालेली असून १००% काम येत्या ३० मे पूर्वी पूर्ण होईल असा विश्वास निरीक्षक तुकाराम मोरमारे यांनी व्यक्त केला.



तळेगाव शहरातील नगरपरिषद (Talegaon News) ते बनेश्वर मंदिर,नगरपरिषद कार्यालय ते श्री नगरीचा पूल, श्री नगरीचा पूल ते ज्ञानेश्वर नगर, ज्ञानेश्वर नगर ते बनेश्वर स्मशानभूमी, बनेश्वर स्मशानभूमी ते वीटभट्टी, वीटभट्टी पासून रेल्वे पुलापर्यंत, लिली अपार्टमेंट, राव कॉलनी ते निलेश गराडे यांचे घर, श्री स्वामी समर्थ मंदिर मठ यशवंत नगर जवळील नाला, भंडारा दर्शन जवळील नाला, अंबिका पार्कचा नाला, म्हाळसकरवाडीचा नाला, हरणेश्वरवाडीचा नाला, कातवी रोडचा नाला, स्वराज्य नगरीचा नाला, थोरला पूल शांताई नगरी फेज २ चा नाला,शिक्षक सोसायटीचा नाला हे ओढे व नाले नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडून साफ व स्वच्छ करून घेण्यात आले या कामावर देखरेख ठेवण्यासाठी पुरुषोत्तम तेजी व राहुल आगळे हे देखरेख करत आहेत.