Team MyPuneCity – तळेगाव एमआयडीसी पोलीस (Talegaon MIDC Police) ठाण्याच्या हद्दीतील इंदोरी येथे हरवलेला आठ वर्षीय मुलगा पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे अवघ्या काही तासात त्याच्या पालकांच्या कुशीत विसावला.
भरत भगवान घोसले (8, तळेगाव) असे मुलाचे नाव आहे.
Warje Mishap : वारजेत हृदयद्रावक घटना : विजेचा धक्का बसून १० वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी तळेगाव एमआयडीसी पोलिसांना (Talegaon MIDC Police) इंदोरी बायपास येथे आठ वर्षीय मुलगा आढळला. तो त्याच्या पालकांना शोधत होता. पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस केली. मात्र त्याला पुरेशी माहिती देता येत नव्हती. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन संवाद साधला असता त्याने केवळ बडा अस्पताल एवढेच सांगितले. त्यामुळे पोलिसांनी तळेगाव स्टेशन येथील जनरल हॉस्पिटल परिसरात त्याच्या आई-वडिलांचा शोध घेण्यास सुरुवात केली.
मुलाच्या आई-वडिलांचा शोध घेत असताना पोलिसांना समजले की एक दांपत्य त्यांच्या हरवलेल्या मुलाला शोधत आहे. पोलिसांनी संबंधित दांपत्याशी संपर्क केला. आपले आई वडील दिसताच मुलगा आई-वडिलांच्या कुशीत विसावला. पोलिसांनी दाखवलेल्या कार्य तत्परतेमुळे मुलगा अवघ्या काही तासात त्याच्या आई-वडिलांकडे सुखरूपपणे पोहोचला. या कामगिरीबद्दल तळेगाव एमआयडीसी पोलिसांचे कौतुक केले जात आहे