situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Talegaon DP Road : तळेगाव डीपी रोडची रुंदी कमी ठेवण्याची मागणी

Published On:

Team MyPuneCity – तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील मारुती मंदिर चौक ते गणपती मंदिर चौक हा डीपी रस्ता (Talegaon DP Road) १८ मीटर ऐवजी १२ मीटर करावा तसेच या रस्त्याचे काम पावसाळ्यानंतर करावे. अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष किशोर भेगडे व माजी नगरसेवक अरुण माने यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांना दिलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे. नगरपरिषदेने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर ह्या डीपी रस्त्याच्या (Talegaon DP Road) रुंदीकरणाचा घाट घातला आहे.

नगर परिषदेने हा रस्ता १८ मीटर रूंदी करण्यामुळे रस्त्यालगत असलेल्या ६९ कुटुंबांची घरे पाडावी लागतील. अशी कुटुंबे बाधित होऊ नये म्हणून सध्याच्या रस्त्याची रुंदी वाढविण्याऐवजी ती १२ मीटर करून रस्ता करावा असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच हे रुंदीकरण पावसाळा झाल्यानंतर करावे अशी मागणीही करण्यात आलेली आहे.

मारुती मंदिर चौकातील नगर परिषदेच्या मुख्य इमारतीपासून संभाजीनगर मार्गे साईनाथ कॉलनी ते डाळआळी गणपती मंदिरापर्यंत १८ मीटर रस्ता रुंदीकरणाचे (Talegaon DP Road) नियोजन करून नगरपरिषदेने या रस्त्यालगत असलेल्या ६९ कुटूंबियांना नोटीसा दिल्या होत्या.

ऐन पावसाळ्याच्या तोंडावर या नोटीसा आल्यानंतर या रस्त्यावरील कुटुंबीयांची घबराट झाली होती. ते सर्व हवालदील झाले होते. त्या सर्वांनी माजी उपनगराध्यक्ष किशोर भेगडे व अरूण माने यांच्याकडे धाव घेऊन ही कारवाई थांबवावी अशी मागणी नागरिकांनी केली.

Follow Us On