situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Talegaon Dabhade: तळेगाव दाभाडे शहरातील पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणार – नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Published On:
PCMC Water
---Advertisement---

Team MyPuneCity – तळेगाव दाभाडे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सोमाटणे जॅकवेल व चौराई जलशुद्धीकरण केंद्रात येत्या गुरुवारपासून देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे संपूर्ण गाव भाग तसेच स्टेशन भागातील काही परिसरात तब्बल दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती नगरपरिषद प्रशासनाने दिली आहे.

ही देखभाल-दुरुस्ती गुरुवार दिनांक ५ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजल्यापासून शनिवार दिनांक ७ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत सोमाटणे जॅकवेल तसेच चौराई जलशुद्धीकरण केंद्र येथील विद्युत व यांत्रिक उपकरणांची देखभाल, आवश्यक दुरुस्ती तसेच प्रणालीतील काही तांत्रिक कामे केली जाणार आहेत.

Nigdi : ‘उत्तम जीवनशैली उत्तम आरोग्याची पहिली पायरी!’ – डाॅ. मानसी हराळे

या कालावधीत तळेगाव शहरातील संपूर्ण गाव भाग तसेच स्टेशन परिसरातील वडगाव फाटा ते स्टेशन चौक या दरम्यानच्या परिसरात पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या काळात आवश्यक पाण्याचा साठा करून ठेवावा व पाणी अतिशय जपून वापरावे, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

यावेळी अचानक पाणीटंचाई निर्माण होऊ नये याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थेकडून जनजागृती केली जात असून, नागरिकांनी देखील प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काही ठिकाणी टँकरद्वारे पुरवठ्याची गरज भासल्यास, नगरपरिषद आवश्यक त्या उपाययोजना करेल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत कुठल्याही गैरसमजाला बळी न पडता नागरिकांनी संयम ठेवावा व आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

Follow Us On