Team MyPuneCity –आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तळेगाव दाभाडे शहर काँग्रेस (आय) पक्षाची विशेष बैठक रविवार (दि१) संपन्न झाली.
ही बैठक तळेगाव दाभाडे शहराध्यक्ष यादवेंद्र खळदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे,माजी नगराध्यक्षा अंजलीराजे दाभाडे, तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ, तळेगाव शहर महिला अध्यक्षा संध्याराजे दाभाडे,कार्याध्यक्ष गोपाळ तंतरपाळे, प्रदेश सचिव निखिल कवीश्वर, किरण मोकाशी, बाळासाहेब शिंदे, जितू खळदे, विक्रांत वाळुंज,राम शहाणे, सम्राट कडोलकर, अभिषेक गोडांबे, सहादू आरडे, प्रभाकर ओंकार, राजू फलके, गणेश काजळे,अक्षय पोटे, संतोष दाभोळे,संभाजी शेडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत असताना समविचारी पक्षांबरोबर आघाडी करावी व शहर काँग्रेसने निवडणूक लढवावी अशा पद्धतीचा आवाज काँग्रेस कार्यकर्त्यांकडून देण्यात आला.
ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, माजी नगराध्यक्ष अंजलीराजे दाभाडे, तळेगाव शहर महिला अध्यक्षा संध्याराजे दाभाडे, तालुका अध्यक्ष यशवंत मोहोळ, कार्याध्यक्ष गोपाळ तंतरपाळे, प्रदेश सचिव निखिल कवीश्वर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
या बैठकीचे आयोजन शहर काँग्रेसचे युवक अध्यक्ष विशाल वाळुंज यांनी केले. प्रास्ताविक राजेंद्र