Team MyPuneCity – जिजामाता चौक ते तळेगाव स्टेशन या वर्दळीच्या (Talegaon Dabhade) मुख्य रस्त्यावर असलेल्या गतिरोधकावरील पांढरे पट्टे धूसर झाले असून,पावसाळ्यापूर्वी ते रंगवण्यात यावेत तसेच या मार्गावरील बेशिस्त पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद अच्युत यांनी मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,जिजामाता चौक ते तळेगाव स्टेशन हा प्रमुख रस्ता असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात बेशिस्त कार पार्किंग करण्यात येत आहे व मोठ्या प्रमाणात फुटपाथवरील अनाधिकृत व्यवसाय करणारे देखील जागा अडवून ठेवत आहेत .त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा या मुख्य रस्त्यावर सतत जाणवत असल्याने त्वरित सदर रस्त्याला वाहतुकीसाठी मोकळा श्वास घेऊ द्यावा ,निवेदनात म्हटले (Talegaon Dabhade) आहे.
जिजामाता चौक ते तळेगाव स्टेशन या मुख्य रस्त्यावर गतिरोधकावरील पांढरे पट्टे धूसर झाल्याने वाहन चालकास गतिरोधकाचा अंदाज येत नाही. त्यामुळे या रस्त्यावर वरचेवर लहान – मोठे अपघात घडत आहेत. गतिरोधकाच्या ठिकाणी तातडीने पांढरे पट्टे मारणे गरजेचे आहे. पुढे गती रोधक आहेत, असे दिशादर्शक फलक लावणे आवश्यक आहे. बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मिलिंद अच्युत यांनी केली (Talegaon Dabhade) आहे.